बोरी येथे लसीकरण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:23 IST2021-06-21T04:23:55+5:302021-06-21T04:23:55+5:30
काेविड लसीकरण मोहीम सर्वत्र सुरू आहे मात्र वेगवेगळे गैरसमज लोकांमध्ये निर्माण झाल्याने गावखेड्यातील लोक सहज लसीकरणासाठी तयार होत नाही. ...

बोरी येथे लसीकरण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
काेविड लसीकरण मोहीम सर्वत्र सुरू आहे मात्र वेगवेगळे गैरसमज लोकांमध्ये निर्माण झाल्याने गावखेड्यातील लोक सहज लसीकरणासाठी तयार होत नाही. यासाठी आरोग्य कर्मचारी आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. अशीच स्थिती बोरी येथे होती, मात्र ग्रामपंचायतीच्या वतीने जनजागृती करण्यात आली. त्यानंतर गावात कोविड लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले. यामध्ये एकूण ३० लोकांनी लसीकरण केले. गट ग्रामपंचायत निमनवाडा येथील सचिव एस. एम. मुळे व कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष लोकांच्या घरी जाऊन लसीकरण करण्यासाठी परावृत्त केले. लसीकरणासाठी निमगाव उपकेंद्राच्या आरोग्य सेविका विद्या आकनुरवार, मंदा निकुरे, मलेरिया वर्कर पठाण, शिक्षिका कोपुलवार, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक कुमरे, अंगणवाडी सेविका यामीना लाकुडवाहे, मदतनीस वर्षा लाकुडवाहे, बी.जी. हिचामी यांनी सहकार्य केले.