मेंढा येथे शिवसंपर्क अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:30 IST2021-07-25T04:30:53+5:302021-07-25T04:30:53+5:30
याप्रसंगी मंचावर गडचिराेली जिल्हाप्रमुख वासुदेव शेडमाके, जिल्हा सहसंपर्क प्रमुख सुनील पोरेड्डीवार उपस्थित हाेते. गाव तिथे शाखा व घर तिथे ...

मेंढा येथे शिवसंपर्क अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
याप्रसंगी मंचावर गडचिराेली जिल्हाप्रमुख वासुदेव शेडमाके, जिल्हा सहसंपर्क प्रमुख सुनील पोरेड्डीवार उपस्थित हाेते. गाव तिथे शाखा व घर तिथे शिवसैनिक निर्माण करण्यास गाववासीयांनी सहकार्य करावे, बाळासाहेबांच्या विचारांचा निखारा हातात घेऊन जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावर उतरून न्याय मिळवून देण्यास आम्ही कटिबद्ध आहाेत, अशी ग्वाही जिल्हा सहसंपर्क प्रमुख सुनील पोरेड्डीवार यांनी दिली. जिल्हाप्रमुख वासुदेव शेडमाके यांनी सदर अभियानाचा उद्देश समजावून सांगितला. प्रत्येक गावात शिवसेनेच्या शाखा उघडणार असून आपल्या गावातील समस्या सोडविण्यात आम्ही सदैव आपल्या पाठीशी असल्याचे ते म्हणाले. यावेळी गडचिरोली तालुकाप्रमुख गजानन नैताम, महिला उपाध्यक्षा अश्विनी चौधरी, मिलिंद भानारकर, ओमकांत साखरे, तेजस गंधलवार, भुवन हजारे, रवींद्र भुरले, संजय मडावी, श्रीधर कोसरे, भोजराज दाणे, पत्रू भोयर, रविशंकर गावतुरे, प्रवीण रामगीरवार व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते. कार्यक्रमाला पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक माेठ्या संख्येने हजर हाेते.