सुरक्षा रक्षक भरतीला उत्स्फूर्त प्रतिसाद
By Admin | Updated: December 24, 2015 01:58 IST2015-12-24T01:58:11+5:302015-12-24T01:58:11+5:30
महात्मा गांधी कला, विज्ञान व स्व. न. पं. वाणिज्य महाविद्यालय आरमोरी येथे जिल्हा कौशल्य विकास रोजगार ...

सुरक्षा रक्षक भरतीला उत्स्फूर्त प्रतिसाद
२५ तरूणांची नियुक्ती : ७२ तरूणांनी घेतला सहभाग
आरमोरी : महात्मा गांधी कला, विज्ञान व स्व. न. पं. वाणिज्य महाविद्यालय आरमोरी येथे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने सुरक्षा रक्षक भरती मेळावा घेण्यात आला. सुरक्षा रक्षक भरतीकरिता रोजगार मेळाव्यात एसआयएस ट्रेनिंग सेंटर हैैद्राबादसाठी ४०० सुरक्षा रक्षकाची पदे तातडीने भरली जाणार होती. त्यानिमित्ताने दोन दिवस सुरक्षा रक्षक भरती करिता ७२ तरूणांनी सहभाग घेतला. त्यातील २५ तरूणांना नियुक्ती देण्यात आली.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा यांनी सुरक्षा रक्षकांना सदर क्षेत्रातील कर्तव्य जबाबदारीने पार पाडायची आहे, असे मार्गदर्शन केले. या निवड प्रक्रियेत एसआयएस ट्रेनिंग सेंटरचे भरती अधिकारी अनुप भगत, महाविद्यालयाच्या भरती प्रक्रियेचे समन्वयक प्रा. शशिकांत गेडाम आदी उपस्थित होते. भरती प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी प्रा. शशिकांत गेडाम, प्रा. पराग मेश्राम, डॉ. विजय गोरडे, प्रा. प्रियदर्शन गणवीर, रमेश इनकने, खुशाल रामटेके, जितेंद्र बोदेले, सचिन ठाकरे यांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)