जांभूळ महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

By Admin | Updated: July 3, 2017 01:16 IST2017-07-03T01:16:46+5:302017-07-03T01:16:46+5:30

कृषी विज्ञान केंद्र सोनापूर-गडचिरोलीच्या वतीने शनिवारी कृषी विज्ञान केंद्राच्या परिसरात घेण्यात आलेल्या...

Spontaneous response to Jambhul Mahotsav | जांभूळ महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

जांभूळ महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

स्टॉलवर रानभाज्याही मांडल्या : लागवड करण्याचे अधिकाऱ्यांनी केले आवाहन
ंलोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कृषी विज्ञान केंद्र सोनापूर-गडचिरोलीच्या वतीने शनिवारी कृषी विज्ञान केंद्राच्या परिसरात घेण्यात आलेल्या जांभूळ व रानभाजी महोत्सवाला जिल्ह्यातील शेतकरी महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या महोत्सवाचे उद्घाटन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे उद्यान विद्या विभागप्रमुख डॉ. डी. एम. पंचभाई यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कार्यक्रम समन्वयक डॉ. व्ही. जे. तांबे, गृह विज्ञान विभागप्रमुख डॉ. कल्पना जाधव, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. धवड, बँक आॅफ महाराष्ट्रचे व्यवस्थापक श्वेता, कृषी महाविद्यालयाचे डॉ. व्ही. डी. काळबांधे, नंदुरबारचे नियोजन अधिकारी सतीश गस्ते, मुख्याध्यापक मनीष शेट्टे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. पाचभाई म्हणाले, जांभूळ पेय हे पेप्सी, कोकाकोला याला पर्याय आहे. २५ टक्के जनता ही मधुमेह आजाराने ग्रस्त आहे. त्यावर औषध म्हणून जांभळाचा वापर होत आहे. जांभळाचे रस या औषधावर रामबाण औषध मानले जाते. त्यामुळे रानमेवा समजल्या जाणाऱ्या रानभाज्यांचे औषधी गुण ओळखून शेतकऱ्यांनी रानभाज्यांची लागवड करावी, असे आवाहन त्यांनी केले.
डॉ. तांबे यांनी जांभूळ व रानभाजीचे महत्त्व विस्तृपणे सांगितले. संचालन व आभार विषय विशेषज्ञ डॉ. योगीता सानप यांनी केले. यशस्वीतेसाठी विषय विशेषज्ञ डॉ. व्ही.एस. कदम, अनिल तारू, बोथीकर काथोड, दीपक चव्हाण, लघु लेखिका ज्योती परसुटकर, प्रयोग क्षेत्र व्यवस्थापक सुनीता थोटे, हितेश राठोड, गजेंद्र मानकर, कृषी विज्ञान केंद्राचे प्रवीण नामूर्ते, नेशन टेकाम, जितेंद्र कस्तुरे, प्रमोद भांडेकर, बाबुराव भोयर आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमाला गडचिरोली जिल्ह्यातील बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.

Web Title: Spontaneous response to Jambhul Mahotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.