स्पर्धांना सखींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By Admin | Updated: July 29, 2016 01:13 IST2016-07-29T01:13:09+5:302016-07-29T01:13:09+5:30

लोकमत सखी मंच धानोराच्या वतीने येथील वन विभागाच्या सभागृहात विविध स्पर्धा नुकत्याच घेण्यात आल्या. या स्पर्धांना सखींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Spontaneous response to the competition | स्पर्धांना सखींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

स्पर्धांना सखींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

धानोरात सखी मंचचा कार्यक्रम : पल्लवी जांभुळकर, नीमा रामपूरकर विजेत्या
धानोरा : लोकमत सखी मंच धानोराच्या वतीने येथील वन विभागाच्या सभागृहात विविध स्पर्धा नुकत्याच घेण्यात आल्या. या स्पर्धांना सखींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमादरम्यान घेण्यात आलेल्या पावसाळी गीतगायन स्पर्धेत प्रथम क्रमांक पल्लवी जांभुळकर, द्वितीय शर्मिला भटकर, तृतीय किरण बर्वे, परफेक्ट ड्रेस मॅचिंग स्पर्धेत प्रथम ज्योती रामपूरकर, द्वितीय कीर्ती खरवडे, तृतीय क्रमांक ज्योती उंदीरवाडे यांनी पटकाविला. पाककला स्पर्धेत प्रथम क्रमांक नीमा रामपूरकर, द्वितीय क्रमांक नंदिनी चौधरी, तृतीय क्रमांक विद्या दास यांनी पटकाविला. वन मिनीट गेम मध्ये प्रथम क्रमांक अनिता चंदेल, द्वितीय सुनंदा कुळमेथे तर तृतीय क्रमांक छाया बरिये यांनी पटकाविला. दुपारी १२.३० वाजेपर्यंत येणाऱ्या सखींमधून लकी लेडी म्हणून कीर्ती ब्राम्हणकर यांची निवड करण्यात आली. विजेत्या सखींना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाला सखी मंच तालुका संयोजिका ज्योती उंदीरवाडे, डॉ. गेडाम, वासनिक, ललीता किरंगे, नांदूरकर, धारा जांभुळकर, माजी बालकल्याण सभापती स्नेहा साळवे, कुनघाडकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किरण बर्वे, मंगला चंदेल, नेत्रा साळवे, मंजुषा बोडगेवार, विभा धाईत, भावना मशाखेत्री, स्नेहलता बागडे, सुषमा राकडे, स्वर्णमाला सहारे, दीपा कोयते, सविता श्रीपदवार, रेखा माळे, सेवंता थूल, चंदा शेडमाके, छाया रामटेके, वंदना शेंडे, लीला बोडगेवार, यामिनी शेरकी, हेमा दास, अंजली वाघमारे, छाया बैस, सुवर्णा भुरसे, मिता चंदेल, परचाके, शुभांगी कुनघाडकर, गुंजना जोशी, लीला मोहुर्ले, अर्चना बोडगेवार मीनाक्षी हलदर यांनी सहकार्य केले. आभार शर्मिष्ठा साळवे यांनी मानले.

शनिवारी सेमानात सखी मंचची सहल
लोकमत सखी मंच शाखा गडचिरोली व नवेगाव/ कोटगलच्या वतीने अंताक्षरी स्पर्धा व सेमाना उद्यानात सहलीचे आयोजन शनिवार ३० जुलै दुपारी दुपारी १२.३० वाजता करण्यात आली आहे. यावेळी सखींनी उपस्थित राहावे, असे आवाहन सखी मंच जिल्हा संयोजिका प्रीती मेश्राम (९५९५४३२९८८) यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी सहसंयोजिका सानिया बैस (९५४५७४६४०७), रश्मी आखाडे, शारदा खंडागळे (९८८१३३९६०२), अंजली वैरागडवार (८२७५४१९५५१), उज्ज्वला साखरे, उषा भानारकर, मृणाल उरकुडे, मंगला बारापात्रे यांच्याशी संपर्क करावा. सेमाना उद्यानात येताना सखींनी जेवणाचे डबे व पाणी बॉटल सोबत आणावे, स्वखर्चाने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.

 

Web Title: Spontaneous response to the competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.