स्पर्धांना सखींचा उत्स्फूर्त प्रतिसाद
By Admin | Updated: August 15, 2015 00:22 IST2015-08-15T00:22:00+5:302015-08-15T00:22:00+5:30
लोकमत सखी मंच शाखा घोटच्या वतीने बुधवारी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांना सखी सदस्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमिला गजपुरे होत्या.

स्पर्धांना सखींचा उत्स्फूर्त प्रतिसाद
घोट येथे कार्यक्रम : मुमताज सय्यद प्रथम तर ताराबाई उईके लकी लेडी
घोट : लोकमत सखी मंच शाखा घोटच्या वतीने बुधवारी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांना सखी सदस्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमिला गजपुरे होत्या. कार्यक्रमाची सुरूवात सखी मंचच्या ध्येयगीताने करण्यात आली. त्यानंतर सखींना ब्युटी पार्लर प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी वन मिनीट गेम शो स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत सखींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. वन मिनीट गेम शो मध्ये मुमताज सय्यद यांनी प्रथम क्रमांक तर पिथा सरकार यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला. ज्योती वनीकर यांनी स्त्रिगीत सादर करून सखींना रिझविले. सोनाली उईके यांनी सखींना ब्युटी पार्लर विषयक सौंदर्याचे धडे दिले. पावसाळ्यात आरोग्याची घ्यावयाची काळजी तसेच यात विविध प्रकारच्या केशरचना, चेहऱ्याची निगा याबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून सखींना मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान लकी लेडी म्हणून ताराबाई उईके यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आशा पेटकर यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका त्यांनी यावेळी विशद केली. कार्यक्रमाचे संचालन माधुरी अगडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंदा दुधबावरे, गीता सरकार, अल्का चांदेकर, कामेलवार, अनिता पाल, शामला अधेंकीवार, सुरेखा निमरड, जीवने यांनी सहकार्य केले. लोकमत सखी मंचच्या माध्यमातून सखी सदस्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या उपक्रमात सखी सदस्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. (वार्ताहर)