स्पर्धांना सखींचा उत्स्फूर्त प्रतिसाद
By Admin | Updated: October 25, 2014 22:40 IST2014-10-25T22:40:57+5:302014-10-25T22:40:57+5:30
लोकमत सखी मंच शाखा चामोर्शीच्या वतीने स्थानिक सांस्कृतिक भवनात सखींसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सखींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

स्पर्धांना सखींचा उत्स्फूर्त प्रतिसाद
चामोर्शी : लोकमत सखी मंच शाखा चामोर्शीच्या वतीने स्थानिक सांस्कृतिक भवनात सखींसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सखींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शहरातील बाजार चौकातील सांस्कृतिक भवना मंगला परचाके यांच्या गु्रपतर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरूवात सरस्वती पूजन व सखी मंचच्या ध्येयगीताने करण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून लोखंडे, चावरे, सखी मंचच्या तालुका संयोजिका रूपाली चेलीयालवार, नम्रता मार्तीवार तसेच सर्व गटप्रमुख सखी सदस्य उपस्थित होत्या. यावेळी सखींसाठी फॅशन शो, वनमिनीट गेम शो, दांडिया स्पर्धा, दिवाळीनिमित्त फराळ प्रशिक्षण कार्यक्रम, लकी लेडी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कविता बंडावार यांनी सखी सदस्यांना फराळाचे प्रशिक्षण दिले. दरम्यान घेण्यात आलेल्या फॅशन शो स्पर्धेत प्रथम क्रमांक नयना सिडाम तर द्वितीय क्रमांक सपना शर्मा यांनी पटकाविला. वनमिनीट गेम शोमध्ये प्रथम क्रमांक मंदा बारसागडे यांनी तर द्वितीय क्रमांक नम्रता बोनगिरवार यांनी पटकाविला. लकी लेडी म्हणून यावेळी वंदना मोंगरकर यांची निवड करण्यात आली. सर्व विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. संचालन ज्योती खेवले तर आभार सुशीला कुनघाडकर यांनी मानले. यशस्वीतेसाठी ममता गौरकार, महानंदा गजभिये, माधुरी भाजीपाले, संगीता कुनघाडकर, पद्मा येडलावार, वंदना टिचकुले, वासेकर, रायपुरे, कुनघाडकर यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)