शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

शालेय विद्यार्थ्यांच्या पाेषण आहारात मसाला, तेलाला दिली बगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:53 IST

गडचिराेली : इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढावी तसेच ती टिकून राहावी, तसेच त्यांना पोषण आहार मिळावा ...

गडचिराेली : इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढावी तसेच ती टिकून राहावी, तसेच त्यांना पोषण आहार मिळावा म्हणून सर्व शाळांमध्ये शालेय पाेषण आहार याेजना कार्यान्वित केली. कोरोनाकाळानंतर शाळा सुरू झाल्या तरी पोषण आहाराचे साहित्य अजूनही घरपोचच दिले जात आहे. पण त्यात केवळ डाळ-तांदूळ दिले जात असून मसाला, तेल यासारख्या पदार्थांसाठी कोणतीही सोय करण्यात आलेली नसल्याचे दिसून येत आहे.

पोषण आहार याेजनेअंतर्गत आधी दुपारच्या सुटीमध्ये विद्यार्थ्यांना शाळेमध्ये तयार झालेले भाेजन दिले जात हाेते. काेराेनामुळे शाळा बंद होत्या. परिणामी या याेजनेची अंमलबजावणी थांबविण्यात आली. आता राज्य शासनाच्या निर्णयानुसार शाळा सुरू झाल्या असल्या तरी या याेजनेअंतर्गत एकाही शाळेमध्ये प्रत्यक्ष भाेजन तयार केले जात नसल्याचे दिसून येते. लाभार्थी विद्यार्थ्यांना घरपाेच डाळ व तांदळाचा पुरवठा केला जात आहे. पण या पुरवठ्यातून मसाला व तत्सम पदार्थ गायब झाले आहेत.

गडचिराेली जिल्ह्यात इयत्ता पहिली ते आठवीच्या दीड हजार आसपास शाळा आहेत. यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी व्यवस्थापनाच्या अनुदानित व विनाअनुदानित शाळांचा समावेश आहे. काेराेना महामारीची समस्या आटाेक्यात आल्यानंतर २३ नाेव्हेंबरपासून इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्ष भरविणे सुरू झाले. या वर्गात सुरुवातीला विद्यार्थी उपस्थिती कमी हाेती. मात्र कालांतराने विद्यार्थी उपस्थिती वाढू लागली. आता या वर्गांमध्ये ६० टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थी उपस्थिती आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दुसऱ्या दिवशीपासून म्हणजे २७ जानेवारीपासून इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सर्व शाळांमध्ये भरविले जात आहेत. या वर्गांमध्ये सरासरी ५५ टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थी उपस्थिती आहे.

बाॅक्स...

९००१८

जिल्ह्यातील पाेषण आहार लाभार्थी

.........................

२४३६

शहरी लाभार्थी

.......................

८७५८२

ग्रामीण लाभार्थी

काेट....

विद्यार्थ्यांना ज्या वस्तू घरपाेच देणे शक्य आहे, अशा तांदूळ व विविध प्रकारच्या डाळी अर्थात कडधान्य दिले जात आहे. शाळांमध्ये वर्ग सुरू झाले असले तरी प्रत्यक्ष भाेजन तयार करून ते विद्यार्थ्यांना देण्याबाबत शासनाकडून काेणतेही आदेश सध्या प्राप्त झाले नाहीत.

- वैभव बारेकर, लेखाधिकारी, प्राथमिक शिक्षण विभाग, गडचिराेली

बाॅक्स....

शाळेतील भाेजनाला ब्रेक

शालेय पाेषण आहार याेजनेअंतर्गत शाळांना तांदूळ व मूग, मसूर डाळीचा पुरवठा केला जाताे. याशिवाय वाटाणा, मटकी, तेल, तिखट, मीठ, जिरा, हळद आदींचाही पुरवठा हाेताे. शिवाय मुख्याध्यापक आपल्यास्तरावर कांदा, लसूण, टमाटर, काेथिंबीर आदी वस्तूंची खरेदी करतात. शाळास्तरावर स्वयंपाकी ठेवून भाेजन तयार करून ते विद्यार्थ्यांना शाळेतच दिले जाते. भाेजनानंतर शाळेचे दुसरे सत्र सुरू हाेते. मात्र काेराेना संसर्गाच्या महामारीने शाळेतील तयार भाेजनाला ब्रेक लागला आहे.