वाहन अधिग्रहणाला गती

By Admin | Updated: September 29, 2014 00:43 IST2014-09-29T00:43:54+5:302014-09-29T00:43:54+5:30

१५ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनाने जोमात तयारी सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी तीनही मतदार संघात परिवहन महामंडळाच्या बसेस,

Speed ​​of vehicle acquisition | वाहन अधिग्रहणाला गती

वाहन अधिग्रहणाला गती

१३८ खासगी वाहने निवडणुकीसाठी लागणार
गडचिरोली : १५ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनाने जोमात तयारी सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी तीनही मतदार संघात परिवहन महामंडळाच्या बसेस, काळी-पिवळी टॅक्सी, खासगी वाहने व शासकीय वाहने मिळून एकूण ३७२ वाहने लागणार आहेत. या वाहनांच्या अधिग्रहणाच्या कार्यवाहीला गती आली आहे.
भारतीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषीत केल्याच्या दिनांकापासून सदर निवडणूक यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे. विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी तसेच एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये याबाबतची सर्व खबरदारी प्रशासन घेत आहे. याकरीता जिल्हा निवडणूक विभागाने सुनियोजन केले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक विभागाला गडचिरोली व अहेरी या दोन्ही आगाराच्या मिळून एकूण ८६ बसेस लागणार आहेत. तसेच पोलीस विभागाला १०० बसेस लागणार आहे. प्रशासनाने निवडणुकीच्या कामासाठी गडचिरोली आगाराकडे ९० बसेसची तर अहेरी आगाराकडे ९६ बसेसची मागणी केल्याची माहिती आहे. याशिवाय निवडणूक विभागाला तिनही मतदार संघासाठी जीप व काळी-पिवळी टॅक्सी यासारखी १३८ वाहने लागणार आहेत. या उपरही ५८ शासकीय वाहने निवडणुकीच्या कामासाठी वापरण्यात येणार आहे. सदर वाहने अधिग्रहीत करण्यात आली आहे. यात विद्युत महामंडळ, वन व आरोग्य विभागाचे वगळून अन्य सर्व विभागाच्या शासकीय वाहनांचा समावेश आहे. पोलीस विभागासाठी मतदान केंद्रांवर जवान पोहोचविण्यासाठी एकूण २५० वाहने लागणार आहेत. यात जीप ५०, मिनीट्रक १०० व महामंडळाच्या १०० बसेसचा समावेश राहणार आहे. याशिवाय पोलीस विभागाकडून दोन हेलिकॉप्टरही वापरण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान गडचिरोली मतदार संघासाठी ३२९, अहेरीसाठी २८६ व आरमोरी मतदार संघासाठी २७८ अशा एकूण ८९३ इव्हीएम मशीन लागणार आहेत. कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी १९५ इव्हीएम मशीनचे नियोजन करण्यात आले आहे.
अचानक एखाद्या इव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्यास तत्काळ संबंधीत मतदान केंद्रावर इव्हीएम मशीनची व्यवस्था व्हावी यासाठी जिल्हा प्रशासन प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस काही इव्हीएम मशीन राखीव ठेवते. या विधानसभा निवडणुकीसाठी गडचिरोली मतदार संघासाठी १७२, अहेरीसाठी १६८ व आरमोरी मतदार संघासाठी १६७ अशा एकूण ५०७ इव्हीएम मशीन राखीव ठेवण्यात आल्या आहेत. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रशासनाच्या वतीने मतदार जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.

Web Title: Speed ​​of vehicle acquisition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.