शिक्षणात खेळाचे विशेष महत्त्व

By Admin | Updated: February 1, 2015 22:57 IST2015-02-01T22:57:39+5:302015-02-01T22:57:39+5:30

विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी खेळ अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावीत असल्याने प्राध्यापक व शिक्षकांनी नियमित शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना खेळासाठीही प्रोत्साहित करावे,

The special significance of the game in education | शिक्षणात खेळाचे विशेष महत्त्व

शिक्षणात खेळाचे विशेष महत्त्व

गडचिरोली : विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी खेळ अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावीत असल्याने प्राध्यापक व शिक्षकांनी नियमित शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना खेळासाठीही प्रोत्साहित करावे, असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. कीर्तिवर्धन दीक्षित यांनी केले.
गोंडवाना विद्यापीठात शिक्षण प्रणालीमध्ये क्रीडा व खेळाचे महत्त्व या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले. याप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. दिलीप जयस्वाल, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विनायक इरपाते, संचालक डॉ. एस. एम. रोकडे, परीक्षा नियंत्रणक डॉ. व्ही. जे. दडवे, वित्त व लेखाधिकारी बी. एस. राठोड, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. इश्वर मोहुर्ले, क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक प्रा. एस. व्ही. कोळे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविकातून प्रा. कोळे यांनी महाराष्ट्र राज्य क्रीडा महोत्सव नाशिक येथे महिला महाविद्यालयाची विद्यार्थिनी रिता धुर्वा हिने लांब उडी स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त केले. औरंगाबाद येथील क्रीडा महोत्सवात रजत पदक प्राप्त केले आहेत. भारत आंतर विद्यापीठ व पश्चिम क्षेत्र आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धांमध्ये २८९ खेळाडूंनी सहभागी घेऊन विद्यापीठाची प्रतिमा उंचावली, अशी माहिती दिली. कार्यक्रमाप्रसंगी उत्कृष्ठ खेळाडू अनिल माळवे, कुणाल चहारे, मंगेश देशमुख, रिता धुर्वा यांचा प्रभारी कुलगुरूंच्या हस्ते शाल, श्रीफळ स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
संचालन डॉ. ईश्वर मोहुर्ले तर आभार डॉ. एस. एम. रोकडे यांनी मानले. (नगर प्रतिनिधी)

Web Title: The special significance of the game in education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.