यंत्राच्या साहाय्याने धानाची पेरणी
By Admin | Updated: February 8, 2015 23:47 IST2015-02-08T23:47:11+5:302015-02-08T23:47:11+5:30
सिरोंचा तालुक्यातील पेंटीपाका येथील शेतकऱ्यांनी यावर्षीपासून पहिल्यांदाच यंत्राच्या साहाय्याने धानपिकाची पेरणी सुरू केली आहे. यामुळे खर्चात बचत होऊन उत्पन्न वाढीस फार मोठी मदत होणार आहे.

यंत्राच्या साहाय्याने धानाची पेरणी
बामणी : सिरोंचा तालुक्यातील पेंटीपाका येथील शेतकऱ्यांनी यावर्षीपासून पहिल्यांदाच यंत्राच्या साहाय्याने धानपिकाची पेरणी सुरू केली आहे. यामुळे खर्चात बचत होऊन उत्पन्न वाढीस फार मोठी मदत होणार आहे.
तालुका कृषी अधिकारी कार्यालय व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने पेंटीपाका येथील प्रयोगशील शेतकरी आर. जे. वेवांतन यांच्या शेतामध्ये उन्हाळी धानपिकाची लागवड मानवचलित धानपेरणी यंत्राच्या सहाय्याने करण्यात आली. या परिसरातील शेतकरी आवत्या टाकून धानाची लागवड करीत होते. मात्र आवत्या पध्दतीमध्ये बियाने जास्त प्रमाणात लागतात. त्याचबरोबर पिकातील निंदण काढतेवेळी अडचण होत असल्याने मजुरांच्या सहाय्याने निंदन काढल्याशिवाय पर्याय राहत नाही. मात्र यंत्राच्या साहाय्याने पेरणी केल्यास दोन सरीच्यामधून कोनोव्हिडरचा वापर करता येतो. यामुळे शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होते. एक चांगली पध्दत असल्याची मत आत्माचे व्यवस्थापक ओ. वाय. लांजेवार यांनी व्यक्त केले. यावेळी आर. बी. फटींग, टी. एम. लोंढे, नागरगोजे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)