धानाची यंत्राद्वारे झाली पेरणी
By Admin | Updated: July 19, 2015 01:50 IST2015-07-19T01:50:17+5:302015-07-19T01:50:17+5:30
कृषी विज्ञान केंद्र सोनापूरच्या वतीने धान पेरणी यंत्राचे प्रात्यक्षिक कृषी महाविद्यालयातील तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना शुक्रवारी दिले.

धानाची यंत्राद्वारे झाली पेरणी
कृषी विज्ञान केंद्राचा उपक्रम : जिल्ह्यात पहिल्यांदाच झाला प्रयोग
गडचिरोली : कृषी विज्ञान केंद्र सोनापूरच्या वतीने धान पेरणी यंत्राचे प्रात्यक्षिक कृषी महाविद्यालयातील तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना शुक्रवारी दिले.
यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे समन्वयक डॉ. एस. पी. लांबे, सहयोगी प्रा. डॉ. श्रीकांत ब्राह्मणकर, सहायक प्रा. डॉ. एस. एल. बोरकर, डॉ. गणेश भगत, जी. बी. गणवीर, योगेश चौके, कृषी सहायक विनोद नलेंगवार, प्रा. संदीप कऱ्हाळे आदी उपस्थित होते. जिल्ह्यात सुमारे १ लाख ४९ हजार हेक्टरवर धान पिकाची लागवड केली जाते. बहुतांश शेतकरी रोवणीपध्दतीने धानाची लागवड करतात. रोवणीसाठी शेतकऱ्यांना सहा ते सात हजार रूपयांचा आगाऊ खर्च येतो. धानबिज पेरणी यंत्राद्वारे धानाची पेरणी केल्यास धानाची रोपवाटीका तयार करणे, चिखलणी, रोवणी आदी खर्च वाचविता येतात. त्यामुळे सदर यंत्र जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे. या यंत्राचे प्रात्यक्षिक ग्रामीण भागातही दाखविले जाणार आहे.(नगर प्रतिनिधी)