नक्षल कुटुंबांनी मांडल्या पोलिसांसमोर व्यथा

By Admin | Updated: December 4, 2015 01:38 IST2015-12-04T01:38:47+5:302015-12-04T01:38:47+5:30

नवजीवन योजनेंतर्गत पोलीस अधिकाऱ्यांनी दुर्गम व नक्षलग्रस्त भागात असलेल्या नक्षल कुटुंबांची प्रत्यक्ष भेट घेतली असता,...

Soreness in front of police constable Naxal family | नक्षल कुटुंबांनी मांडल्या पोलिसांसमोर व्यथा

नक्षल कुटुंबांनी मांडल्या पोलिसांसमोर व्यथा

नवजीवन मोहीम : पोलीस अधिकाऱ्यांची नक्षल कुटुंबांना भेट; योजनेची दिली माहिती
गडचिरोली : नवजीवन योजनेंतर्गत पोलीस अधिकाऱ्यांनी दुर्गम व नक्षलग्रस्त भागात असलेल्या नक्षल कुटुंबांची प्रत्यक्ष भेट घेतली असता, नक्षल कुटुंबांनी स्वत:च्या व्यथा पोलीस अधिकाऱ्यांसमोर मांडल्या.
नक्षल्यांना आत्मसमर्पण योजनेचा लाभ देऊन त्यांना व त्यांच्या कुटुंबाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पोलीस विभागाने नवजीवन मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत पोलीस अधिकारी नक्षल कुटुंबाला प्रत्यक्ष भेट देऊन त्यांना आत्मसमर्पण योजनेचे महत्त्व पटवून देत आहेत. अहेरी एलओएस दलम कमांडर अशोक मंगा पेंदाम याच्या लिंगमपल्ली येथील कुटुंबाला रेपनपल्लीचे प्रभारी पोलीस अधिकारी यांनी भेट दिली. यावेळी त्याची पत्नी आत्मसमर्पीत दुर्गूबाई अशोक पेंदाम त्यांची दोन लहान मुले, आई व भाऊ हजर होते. चातगाव दलम सदस्य शरद उर्फ गोविंदा शामजी आतला याच्या पुस्टोला येथील घराला पोलीस अधिकाऱ्यांनी भेट दिली. यावेळी त्याचे आई-वडिल व भाऊ हजर होते. आईने त्याची व्यथा मांडली व त्याच्या जीवनाबद्दल काळजी व्यक्त केली. पोलीस अधिकाऱ्यांनी तिला आत्मसमर्पण योजना समाजावून सांगितली.
अहेरी उपविभागांतर्गत येत असलेल्या कोळसेपल्ली येथील नक्षल सदस्य जन्नी डोलू तलांडी हिच्या घरी पोलीस अधिकारी लवटे यांनी भेट दिली. पोलीस अधिकाऱ्यांनी कुटुंबातील सदस्यांना आत्मसमर्पण योजनेचे महत्त्व पटवून दिले. लवटे यांनी वेलगुर येथील नक्षल सदस्य पापक्क्या बुचय्या चौधरी याच्याच्याही कुटुंबाची भेट घेतली. नक्षल कुटुंबांना भेटीदरम्यान मिठाईचे वितरण करण्यात आले. पोलीस विभागाच्या वतीने नवजीवन मोहीम मागील १५ दिवसांपासून राबविली जात आहे. त्याचे सकारात्मक परिणाम भविष्यात दिसून येईल, अशी आशा पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Soreness in front of police constable Naxal family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.