शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

जावयाची हत्या; अंत्ययात्रेला गेलेल्या सासऱ्यांनाही काळाने गाठले ! कार नदीत कोसळून दोघांचा मृत्यू

By संजय तिपाले | Updated: January 20, 2026 18:20 IST

Gadchiroli : नियतीचे चक्र किती क्रूर असावे, याचा दाहक अनुभव अहेरीकरांनी २० जानेवारी रोजी घेतला. दोन दिवसांपूर्वी जेहत्या झालेल्या चुलत जावयाच्या अंत्यविधीला उपस्थित राहून, डोळ्यातील आसवे पुसत परतणाऱ्या नातेवाईकांवर वाटेतच काळाने झडप घातली.

‎​लोकमत न्यूज नेटवर्क‎गडचिरोली : नियतीचे चक्र किती क्रूर असावे, याचा दाहक अनुभव अहेरीकरांनी २० जानेवारी रोजी घेतला. दोन दिवसांपूर्वी जेहत्या झालेल्या चुलत जावयाच्या अंत्यविधीला उपस्थित राहून, डोळ्यातील आसवे पुसत परतणाऱ्या नातेवाईकांवर वाटेतच काळाने झडप घातली. आलापल्ली - सिरोंचा महामार्गावर बोरीजवळील दिना नदीच्या पुलावरून कार खाली कोसळली. यात चुलत सासरे यादव विठ्ठलराव कोलपाकवार (७३, रा. आष्टी ता. चामोर्शी) व यादव यांचे चुलत बंधू सुनील मुरलीधर कोलपाकवार (५५, रा.बोरी ता.अहेरी) यांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे जखमी आहेत.‎‎​रवींद्र तंगडपल्लीवार (४९, रा.आलापल्ली ता.अहेरी) हे १८ जानेवारी रोजी दुपारपासून बेपत्ता झाले होते, १९ जानेवारीला सकाळी सिरोंचा मार्गावर कालिमाता मंदिराजवळ त्यांचा मृतदेह आढळला होता. अज्ञात आरोपीने त्यांची धारदार शस्त्राने हत्या केली होती. या घटनेने आधीच खळबळ उडाली असताना, २० रोजी त्यांच्या अंत्यविधीसाठी त्यांचे नातेवाईक जमले होते. आष्टी येथील प्रसिद्ध किराणा व्यावसायिक यादव विठ्ठलराव कोलपाकवार (७३) हे आपल्या चुलत जावयाच्या अंत्यविधीसाठी आले होते. त्यांच्यासोबत पोस्टमास्तर असलेले त्यांचे चुलत बंधू सुनील मुरलीधर कोलपाकवार हेदेखील होते. अंत्यसंस्कार आटोपून   सर्वजण कारने (एमएच ३३ व्ही - ८२४९) परतत होते. दुपारी दीडच्या सुमारास दिना नदीच्या पुलावरून कार नदीत कोसळली.

‎​कठडे नसल्याने घात, कार थेट नदीत 

‎दिना नदीचा हा पूल सध्या वाहनधारकांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे. पुलाला संरक्षक कठडे नसल्याने चालकाला  अंदाज आला नाही. परिणामी, कार अनियंत्रित होऊन थेट खोल नदीत कोसळली. त्यामुळे प्रशासकीय हलगर्जीबद्दल तीव्र रोष व्यक्त होत आहे. दरम्यान, या पुलाशेजारी नवीन उंच पुलाचे बांधकाम सध्या प्रगतीपथावर सुरू आहे.

‎​तीन जखमींवर उपचार सुरू ‎या भीषण अपघातात अभिजित यादव कोलपाकवार, अर्चना यादव कोलपाकवार आणि पद्मा सत्यनारायण कोलपाकवार हे तिघे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने चंद्रपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. 

‎​पोलिसांची युद्धपातळीवर मदत

‎घटनेची भीषणता पाहून परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. अहेरीचे पोलिस निरीक्षक हर्षल एकरे व उपनिरीक्षक देवेंद्र पटले यांनी तातडीने फौजफाट्यासह घटनास्थळ गाठले. त्यांनी जखमींना तातडीने रुग्णालयात हलविले. दरम्यान, दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अहेरी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAccidentअपघातGadchiroliगडचिरोली