गडचिरोलीतील 'या' गावातील काही नागरिक करतात रावणदहन तर काही रावणपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2020 20:23 IST2020-10-26T20:23:23+5:302020-10-26T20:23:45+5:30
Gadchiroli News Dasara कोरची गावात रावणदहन व रावणपूजन हे दोन्ही कार्यक्रम यंदा कोरोनामुळे साध्या पद्धतीने साजरे करण्यात आले.

गडचिरोलीतील 'या' गावातील काही नागरिक करतात रावणदहन तर काही रावणपूजन
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: कोरची गावात रावणदहन व रावणपूजन हे दोन्ही कार्यक्रम यंदा कोरोनामुळे साध्या पद्धतीने साजरे करण्यात आले. सार्वजनिक दसरा व रावण दहन कार्यक्रम दरवर्षी परंपरेनुसार भव्य प्रमाणावर हजारो लोकांच्या उपस्थितीत साजरा होत असतो. तर दुसरीकडे मागील काही वर्षांपासून गोटू सेनेच्या प्रांगणात आदिवासी बांधव मोठ्या संख्यांनी एकत्रित येऊन रावणाची पूजा करून शहरातून रॅली काढत असत. परंतु यावेळी कोरोनाचे सावट असल्यामुळे नागरिकांनी आरोग्य जपण्याकरिता सदर कार्यक्रम साध्या पद्धतीने एक दिवस पुढे ढकलून सोमवारी दसरा विजयादशमी रावण दहनाचा कार्यक्रम केला.
तर दुसरीकडे मागील काही वर्षांपासून सम्राट रावणाची पूजा कोरची येथील गोटूल भुमीमध्ये कोयतुर गोंड आदिवासी बांधवाकडून केली जात असायची. मात्र रविवारला आदिवासी बांधवांनी कमी संख्येत एकत्रित होऊन साध्या पद्धतीने पूजा केली.