शिक्षकांच्या समस्या सोडवा
By Admin | Updated: April 8, 2017 01:52 IST2017-04-08T01:52:41+5:302017-04-08T01:52:41+5:30
जिल्ह्यात कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या समस्या सोडविण्यात याव्या, अशी मागणी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाने

शिक्षकांच्या समस्या सोडवा
जि. प. अध्यक्षांचा सत्कार : कास्ट्राईब संघटनेची मागणी
गडचिरोली : जिल्ह्यात कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या समस्या सोडविण्यात याव्या, अशी मागणी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाने जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर यांना ६ एप्रिल रोजी निवेदन देऊन केली आहे. याप्रसंगी योगीता भांडेकर यांचा सत्कार करण्यात आला.
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदलीसाठी सोपे व अवघड क्षेत्र ठरविणे, विषय शिक्षकांच्या नियुक्तीसाठी विषयवार याद्या प्रसिद्ध करणे, शासन निर्णयानुसार मागासवर्गीय कर्मचाऱ्यांची भरती व पदोन्नती प्रक्रिया राबविणे आदी विषयांवर कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या सदस्यांनी जि. प. अध्यक्षांसोबत चर्चा केली. या समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन जि. प. अध्यक्षांनी दिले.
शिष्टमंडळात संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार घोडेस्वार, सरचिटणीस गंगाधर मडावी, रायसिंग राठोड, डी. के. डोहणे, प्रभाकर साखरे, रवींद्र उईके, रामनाथ खोब्रागडे, चंदू रामटेके, दीपक भैसारे, राजेश खेवले, शैलेश गेडाम, नरेश बांबोळे, भिष्मानंद दुधे, खेचरस्वामी कुमरे, भिष्मानंद दुधे, कांतीलाल साखरे, विरेंद्र सोनवने, प्रमोद भानारकर, रवींद्र पटले, देवराव शेडमाके, डी. एल. बोरकर, रवींद्र गेडाम, राहुल गेडाम, पुंडलिक शेंडे, सुखलाल गोटामी, संतोष ठेंभूर्णे, चक्रपाणि कन्नाके, डी. बी. बोरकर, दौलत घोडाम, सदाशिव कोडापे, प्रदीप तेलंग, प्रमोद सरदारे, दिलीप मेश्राम, यशवंत जांभुळकर, किशोर फुलझेले, मंगरू आत्राम, मच्छिंद्र हिचामी उपस्थित होते.