राशन दुकानदारांच्या समस्या सोडवा
By Admin | Updated: February 12, 2015 01:09 IST2015-02-12T01:09:12+5:302015-02-12T01:09:12+5:30
अखिल भारतीय राशन दुकानदार व केरोसीन परवानाधारक संघटनेच्या आवाहनानुसार सरकारी स्वस्त धान्य दुकान व केरोसीन परवानाधारक तालुका संघटना ...

राशन दुकानदारांच्या समस्या सोडवा
अहेरी : अखिल भारतीय राशन दुकानदार व केरोसीन परवानाधारक संघटनेच्या आवाहनानुसार सरकारी स्वस्त धान्य दुकान व केरोसीन परवानाधारक तालुका संघटना अहेरीच्या वतीने विविध मागण्यांसंदर्भात अहेरीचे तहसीलदार के. वाय. कुनारपवार यांना मंगळवारी निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी व तहसीलदार कुनारपवार यांच्यात मागण्यांबाबत चर्चा झाली.
दिलेल्या निवेदनात रेशन दुकानदार व केरोसीन परवानाधारकांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा, केरोसीन नियतन वाढविण्यात यावा, रेशन दुकानाचे भाडे व दोन नोकरांचा पगार व वीज बिलाची रक्कम शासनाने द्यावी, रेशन दुकानापर्यंत धान्य पोहोचविण्याचा खर्च देण्यात यावा, स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचे वितरण रेशन व केरोसीन दुकानातून व्हावे, एपीएलधारकांच्या धान्याचे बंद केलेले वितरण पुन्हा सुरू करण्यात यावे, रेशनधान्याचे कमिशन प्रती क्विंटल १०० रूपये करण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश आहे.
यावेळी सरकारी स्वस्त धान्य व केरोसीन परवानाधारक तालुका संघटनेचे अध्यक्ष मारय्या बेझनवार, उपाध्यक्ष जगदीश सौरंगपते, पी. यू. सुंधरी, गंगाराम दुर्गम, बाबुराव मुक्कावार, एल. के. परकिवार, बी. पी. सिडाम, जे. बी. सिडाम, एस. ई. करपेत, बी. बी. मडावी, जे. व्ही. सडमेक, जे. एल. आत्राम, बी. बी. कुमरे, पी. एच. बंडावार, भगवान मडावी, वैभव कोटगीरवार, आर. के. भट आदी स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक विक्रेते उपस्थित होते. तहसीलदार कुनारपवार यांनी मागण्यांबाबत शासनाकडे पाठपुरावा करून दुकानदारांच्या भावना शासनस्तरावर मांडणार असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले. (तालुका प्रतिनिधी)