गाेंडवाना विद्यापीठातील शिक्षणविषयक समस्या साेडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:10 IST2021-02-06T05:10:02+5:302021-02-06T05:10:02+5:30
गडचिराेली : गाेंडवाना विद्यापीठासह विद्यार्थी व शिक्षणविषयक समस्या साेडवाव्या, अशी मागणी बहुजन रिपब्लिकन साेशालिस्ट पार्टीच्या वतीने उच्च व तंत्रशिक्षण ...

गाेंडवाना विद्यापीठातील शिक्षणविषयक समस्या साेडवा
गडचिराेली : गाेंडवाना विद्यापीठासह विद्यार्थी व शिक्षणविषयक समस्या साेडवाव्या, अशी मागणी बहुजन रिपब्लिकन साेशालिस्ट पार्टीच्या वतीने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
गाेंडवाना विद्यापीठाची निर्मिती हाेऊन दहा वर्षांचा कालावधी उलटला परंतु येथील समस्या सुटल्या नाहीत. गाेंडवाना विद्यापीठात आदिवासी संग्रहालय व पुराभि लेखागार सुरू करावे, तसेच आदिवासी संशाेधन केंद्र उभारावे. नवीन शिक्षण धाेरण लागू करू नये, विद्यापीठाच्या विविध मंडळावर सदस्यांचे नामनिर्देशन बंद करावे व निवडणूक घ्यावी. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र व स्त्री अभ्यास केंद्र सुरू करावे, प्राध्यापक पदभरती केंद्रीय पद्धतीने करावी, पीएचडी नाेंदणी शुल्क ५०० रुपये घ्यावे. नवीन वसतिगृह निर्माण करावे, वसतिगृह प्रवेश वार्षिक शुल्क १०० रुपये ठेवावे, विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी कमवा व शिका याेजनेंतर्गत मागेल त्याला काम आणि कामाचे दाम १५० रूपये तास अशा पद्धतीने दरराेज दाेन तास काम याप्रमाणे याेजना राबवावी आदी मागण्यांचा समावेश हाेता. निवेदन देताना बीआरएसपीचे जिल्हाध्यक्ष राज बन्साेड व पदाधिकारी उपस्थित हाेते.
बाॅक्स ......
अनुदानित काॅलेजमधील रिक्त पदे भरा
राज्यातील अनुदानित महाविद्यालयातील रिक्त असलेली सहायक प्राध्यापकांची संपूर्ण पदे भरावी, अशी मागणी उच्च शिक्षित प्राध्यापक संघटनेने उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. महाविद्यालयातील पदभरती करताना २०० पाॅईंट बिंदूनामावली लागू करावी व पारदर्शक पद्धतीने पदे भरावी, अशी मागणी संघटनेने ना. सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. निवेदन देताना संघटनेचे अध्यक्ष अविनाश भुरसे, राेशन नासरे, अमरीश उराडे, सचिन बाेधाने, संपदा पायाळ, राेशना म्हस्के, दिगांबर पिपरे उपस्थित हाेते.