शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

सिरोंचाच्या खंडीत वीज पुरवठ्यावर निघणार तोडगा

By admin | Updated: October 6, 2015 01:57 IST

आलापल्लीवरून सिरोंचाचा वीज पुरवठा हा संपूर्ण जंगलातून होतो. पावसाळ्यात तसेच इतर काळातही लहानसहान

गडचिरोली : आलापल्लीवरून सिरोंचाचा वीज पुरवठा हा संपूर्ण जंगलातून होतो. पावसाळ्यात तसेच इतर काळातही लहानसहान कारणाने हा वीज पुरवठा खंडीत होत असतो. अनेकदा वीज तारा जंगलात तुटल्याने अडचण येऊन पाच-पाच दिवस वीज पुरवठा सुरू होत नाही. या अडचणीवर आता तोडगा निघणार आहे. अहेरी तालुक्याच्या जिमलगट्टा येथे नवे ३३ केव्ही वीज उपकेंद्र निर्माण केले जाणार आहे. त्यामुळे आलापल्ली ते सिरोंचा जाणारा वीज प्रवाहाच्या विद्युत वाहिनीला आता जिमलगट्टा येथे ब्रेक मिळून सिरोंचाला येथून वीज पुरवठा होईल. जिमलगट्टासह पुराडा व अडपल्ली येथेही नवे ३३ केव्हीचे तीन उपकेंद्र निर्माण होणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ३३ केव्हीचे तीन उपकेंद्र कुरखेडा तालुक्याच्या पुराडा, मुलचेरा तालुक्याच्या अडपल्ली तर अहेरी तालुक्याच्या जिमलगट्टा येथे पूर्ण करण्यात येणार आहे. आलापल्ली-सिरोंचा या मार्गावरून जंगलातून वीज तारा जातात. अनेकदा या तारा लोंबकळल्यामुळे येथील वीज पुरवठा बंद पडून जातो. पावसाळ्यात या घटना वारंवार घडतात व हा वीज पुरवठा बंद झाल्याने या भागात चार ते पाच दिवस तो खंडीतच राहतो. याबाबत सातत्याने तक्रारी होत्या. त्यानंतर आता या मार्गावर जिमलगट्टा येथे वीज उपकेंद्र होऊ घातल्या आहेत. तसेच कुरखेडा, कोरची या भागासाठी पुराडा येथे वीज उपकेंद्र दिले जाणार आहे. कोरची तालुक्याला वीज पुरवठा करण्यासाठी याची मदत होणार आहे. तर मुलचेरा तालुक्यातील अडपल्ली या दुर्गम गावामध्ये वीज उपकेंद्र निर्माण झाल्यास त्याचा फायदा एटापल्ली, मुलचेरा या दोन्ही तालुक्यांना होईल. या उपकेंद्रासाठी ४ कोटी ४४ लाख रूपयांची निधीची तरतूद करण्यात आली आहे. उपकेंद्र रोहित्र क्षमता वाढीचे दोन काम ९० लाख रूपये निधीतून केले जाणार असून ४९.७७ किमीची ११ केव्ही उच्चदाब वाहिनी निर्माण करण्यात येणार आहे. यासाठी ७ कोटी ७३ लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.६२.२० किमी लांबीच्या लघुदाब वाहिनीसाठी १ कोटी रूपयांच्या निधीची तरतूद करण्यात येणार आहे. वाहिन्यांचे विलगीकरणाचे सात कामे असून घरगुती वीज जोडणीचे २६ हजार ११३ कामे जिल्ह्यात प्रस्तावित करण्यात आले.दुसऱ्या टप्प्यात ७ कोटी ७९ लाखांची पाच विद्युत उपकेंद्र निर्माण करण्यात येणार आहे. ३३५ किमीची ११ केव्ही उच्चदाब वाहिनी ३३ कोटी ४४ लाख रूपये खर्च करून उभारण्यात येणार आहे. दोन्ही टप्प्यामध्ये १६६ विद्युत वितरण रोहित्र ४ कोटी २४ लाख रूपये खर्च करून बसविण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात ११० किमी लघुदाब वाहिनी निर्माण करण्यात येणार आहे. या सर्व कामांमुळे जिल्ह्यातील वीज नसलेल्या जवळजवळ १२२ गावांनाही वीज पुरवठा सुरू होण्याची शक्यता आहे. शासनाने दिनानाथ उपाध्याय ग्रामज्योती योजना लागू केली असल्यामुळे निधीची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर होईल, असे दिसून येत आहे. या संदर्भात खासदार अशोक नेते यांनी नुकताच आढावा घेतला. त्यामुळे या कामाला गती दिली जाणार आहे. या कामासाठी निधीचीही तरतूद झाली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)