शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

तडजोडीवरच समाधान

By admin | Updated: July 19, 2014 23:53 IST

अन्न व औषधांच्या दर्जावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या अन्न व औषध प्रशासन विभागाने एका वर्षात केवळ ८७ प्रकरणांच्या माध्यमातून १८ हजार ४०० रूपयांचा तडजोड शुल्क गोळा केला आहे.

अन्न व औषध प्रशासन : वर्षात केवळ १८ हजाराचा दंडगडचिरोली : अन्न व औषधांच्या दर्जावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या अन्न व औषध प्रशासन विभागाने एका वर्षात केवळ ८७ प्रकरणांच्या माध्यमातून १८ हजार ४०० रूपयांचा तडजोड शुल्क गोळा केला आहे. ही कारवाई नगन्य असून अन्न व औषध प्रशासन विभागाच्या दुर्लक्षामुळे जिल्ह्यात खुलेआम खर्राची विक्री केली जात आहे. बाजारपेठेत विकल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांचा दर्जा चांगला असण्यावर नागरिकांचे आरोग्य अवलंबून आहे. त्यामुळे सदर अन्न पदार्थ तपासण्यासाठी व त्याच्या दर्जावर नियंत्रण ठेवण्यासाठी अन्न व औषध प्रशासन हा स्वतंत्र विभाग स्थापन करण्यात आला आहे. गुटख्यामुळे कॅन्सर या महाभयंकर रोगाची लागण होत असल्याने शासनाने संपूर्ण राज्यात गुटख्यावर बंदी आणली. त्यानंतर पूर्व विदर्भात प्रसिध्द असलेल्या खर्ऱ्यावरसुध्दा बंदी आणली आहे. खर्रा हा सुगंधित तंबाखू व सुपारीपासून बनविला जातो. सुगंधित तंबाखू व खर्रावर बंदी आणली असली तरी ग्रामीण भागास शहरी भागातही खर्राची खुलेआम विक्री केली जात आहे. खर्ऱ्याच्या सवयीमुळे एका घरचे किमान ५० रूपये दररोज खर्च होत आहेत. खुलेआम विकल्या जाणाऱ्या खर्रा दुकानांवर छापे टाकण्याकडे अन्न व औषध प्रशासन विभागाचे कमालिचे दुर्लक्ष झाले आहे. १ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१४ या कालावधीत या कार्यालयाच्या मार्फतीने सिगरेट व तंबाखुजन्य उत्पादन कायदा २००३ चे कलम ४ चा भंग केल्यामुळे ३९ जणांकडून ७ हजार ८०० रूपयांचा तडजोड शुल्क गोळा करण्यात आला तर कलम ६ चा भंग केल्याप्रकरणी ९ हजार ६०० रूपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे. दोनही मिळून १८ हजार ४०० रूपयाचे तडजोड शुल्क गोळा झाले आहे. खर्राची खुलेआम केली जाणार विक्री लक्षात घेतली तर एवढे शुल्क गडचिरोली शहरातील एका वार्डातील पानठेल्यांवर कारवाई केली तरी गोळा होऊ शकते, अशी परिस्थिती आहे. मात्र अन्न, औषध प्रशासन विभागाचे अधिकारी नाममात्र कारवाई करून स्वत:ची प्रशंसा करून घेण्यातच व्यस्त आहे. मोठ्या विक्रेत्यांकडे त्यांचे साफ दुर्लक्ष आहे.