शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुंबईतील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर
2
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
3
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
4
Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा
5
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
6
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
7
रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक 
8
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
9
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
10
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
11
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
12
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
13
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
14
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
15
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
16
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
17
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
18
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
19
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
20
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले

एटापल्ली तालुक्यातील सौरदिवे नादुरुस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:36 IST

पशुखाद्यांच्या किमतीत भरमसाठ वाढ आलापल्ली : दुभत्या व कष्टाचे काम करणाऱ्या जनावरांना सरकी, ढेप, कडधान्यांचा कोंडा चारल्या जातो. यामुळे ...

पशुखाद्यांच्या किमतीत भरमसाठ वाढ

आलापल्ली : दुभत्या व कष्टाचे काम करणाऱ्या जनावरांना सरकी, ढेप, कडधान्यांचा कोंडा चारल्या जातो. यामुळे जनावर सुदृढ राहून दूध जास्त देते. वाढत्या महागाईचा फटका पशुखाद्यांनाही बसला आहे. किमती १० टक्क्यांनी वाढल्या.

सिरोंचा तालुक्यातील रस्त्यांची दुरुस्ती करा

सिरोंचा : जिल्ह्यातील दुर्गम भागातील जवळपास ३०० गावांना अजूनही जाण्यासाठी रस्ते नाहीत. त्यामुळे या गावातील नागरिकांना पायवाटेचाच आधार घ्यावा लागत आहे. शासनाची सडक योजना दुर्गम गावापर्यंत अद्यापही पोहोचली नाही.

सुबाभूळ लागवडीसाठी अनुदान द्या

धानोरा : सुबाभूळ लागवडीकरिता शेतकऱ्यांना कृषी व वन विभागाने अनुदान द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. यातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ होतो. त्यामुळे स्थानिक स्तरावरून शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन अनुदान द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. शेतकऱ्यांसाठी ही बाब फायदेशीर राहणार आहे.

औद्योगिक वसाहतीला प्रोत्साहनाची गरज

धानोरा : छत्तीसगड सीमेला लागून असलेल्या धानोरा तालुका मुख्यालयात औद्योगिक वसाहत निर्माण करण्याचा निर्णय आघाडी सरकारने घेतला होता. मात्र याबाबत अंमलबजावणी करण्यात आली नाही. त्यामुळे व्यावसायिकांना उद्योग टाकण्यास अडचणी येत आहेत.

कुरखेडातील गावांना लाईनमनच नाही

कुरखेडा : तालुक्यातील अनेक गावांत राईसमिल, आटाचक्की, सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजना व कृषिपंपाना विद्युत पुरवठा करावा लागतो. परंतु अनेक गावांत लाईनमन नसल्याने विद्युत पुरवठा सुरळीत करण्याकडे दुर्लक्ष होत असते. तसेच एकाकडे अनेक गावांचा प्रभार आहे.

आरोग्य उपकेंद्रांना इमारतीची प्रतीक्षा

गडचिरोली : उपकेंद्र गावातीलच एका लहानशा भाड्याच्या खोलीत चालविले जात आहेत. इमारत नसल्याने प्रसूती कक्षाची सुविधा नाही. त्यामुळे लांब अंतरावर असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात गरोदर मातांना प्रसूतीसाठी न्यावे लागत आहे. आरोग्य उपकेंद्रासाठी स्वतंत्र इमारत बांधण्याची मागणी होत आहे.

प्लॅस्टिक पिशव्या टाकणाऱ्यांवर कारवाई नाही

देसाईगंज : नगर पालिकेच्या क्षेत्रात व्यावसायिक व नागरिक मोठ्या प्रमाणावर काळ्या व पांढऱ्या प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करतात. येथील राजेंद्र वॉर्ड, माता वॉर्ड व गांधी वॉर्डातील अनेकजण दुकान बंद झाल्यानंतर या पिशव्यां व प्लॅस्टिक कागद रस्त्यावर व नाल्यांमध्ये फेकतात. नाल्यांमध्ये प्लॅस्टिक टाकले जात असल्याने सांडपाणी निचरा हाेण्याचा मार्ग बंद झाला आहे. कारवाईची नितांत गरज आहे.

रेपनपल्ली मार्गावरील पूल कालबाह्य

कमलापूर : कमलापूर ते रेपनपल्ली या तीन किमीच्या रस्त्यावरील डांबर जागोजागी उखडले आहे. आतील दगड व गिट्टी बाहेर आली आहे. तसेच या रस्त्यावर असलेला पूलसुध्दा जीर्ण अवस्थेत आहे. सदर पुलाची उंची कमी आहे. त्यामुळे या पुलावरून पावसाळ्यात पाणी राहते. वेळोवेळी वाहतूक खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत.

बदक पैदास केंद्राची अवस्था बकाल

विसोरा : तालुक्यातील विसोरा गावानजीक २० एकर जागेत १९८३-९३..................... ला बदक पैदास प्रक्षेत्राची निर्मिती करण्यात आली. मात्र योग्य नियोजन व जनजागृतीअभावी सदर बदक पैदास प्रक्षेत्र अतिशय मर्यादित झाले असून या प्रक्षेत्राची भिस्त परिचर व पहारेकऱ्यांवरच अवलंबून असल्याचे दिसून येते. बदक पैदास केंद्राच्या व्यवस्थेकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

कंटेनर सभोेवतालचा कचरा उचला

गडचिरोली : घरून गोळा केलेला कचरा घंटागाडीचालक जवळपासच्या कचरा कंटेनरमध्ये नेऊन टाकतात. मात्र टाकतेवेळी पुरेशी काळजी घेतली जात नसल्याने अर्धा कचरा खाली पडतो. सदर कचरा वादळामुळे नागरिकांच्या दारापर्यंत उडत जाते. या कचऱ्यावर दिवसभर डुकरांचा हैदोस राहतो. कंटेनरमध्ये कचरा व्यवस्थित टाकण्याची मागणी आहे.

विद्युत तारांवरील फांद्यांची कटाई करा

अहेरी : रस्त्याच्या बाजूने विजेचे खांब आहेत. रस्त्याच्या बाजूला झाडेसुद्धा आहेत. झाडाच्या फांद्या विद्युत तारांवर आल्याने विद्युत पुरवठा खंडित होण्याचा धोका असतो. त्याचबरोेबर एखादी दुर्घटनासुद्धा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे विद्युत तारांवरील फांद्या तोडण्याची मागणी आहे.

टाकीत साचतेय अशुद्ध पाणी

गडचिरोली : शुद्ध व पुरेसा पाण्याचा पुरवठा करण्यासाठी शहरात पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले आहे. परंतु या टाकीच्या सुरक्षेसाठी पालिका प्रशासन गंभीर नसल्याने या टाकीच्या परिसरात घाण साचून राहत आहे.

कैकाडी वस्ती साेयीसुविधांपासून वंचित

गडचिरोली : शहरालगत चामोर्शी मार्गावर कैकाडी समाज बांधवांची वस्ती आहे. या ठिकाणी अनेक झोपड्या आहेत. मात्र येथील नागरिक पिण्याचे पाणी, आरोग्य, शिक्षण आदी मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. या वस्तीतील नागरिक नगर पालिकेचे मतदार आहेत.

उघड्यावरील खाद्यपदार्थांकडे दुर्लक्ष

गडचिरोली : अनेक तालुका मुख्यालयाच्या उपाहारगृह व हॉटेलमध्ये उघड्यावर खाद्यपदार्थाची विक्री होत आहे. यामुळे परिसरात विविध आजारांचा प्रादुर्भाव होत आहे. मात्र याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

वयोवृद्धांना तीन हजार रुपये पेन्शन द्या

आलापल्ली : जिल्ह्यात वयोवृध्द ओबीसी शेतकरी व शेतमजुरांची संख्या मोठी असून त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी ओबीसी प्रवर्गातील शेतकरी, शेतमजुरांना वयाच्या ६० वर्षानंतर प्रति महिना तीन हजार रुपये वृध्दापकालीन अर्थसाहाय्य पेन्शन योजना लागू करण्यात यावी.

चतुर्थ श्रेणी दर्जापासून कोतवाल वंचित

आष्टी : गावात दवंडी देणे, मृतदेहाची विल्हेवाट लावणे, शेतसारा जमा करणे, अशी विविध कामे करणाऱ्या जिल्हाभरातील साझा अंतर्गत कोतवालांना महिन्याकाठी अल्प मानधन दिले जात आहे. वारंवार मागणी करूनही कोतवालांना चतुर्थ श्रेणी दर्जा देण्याकडे शासन दुर्लक्ष करीत आहे.

शेतकऱ्यांना हस्तलिखित सातबारा पुरवा

देसाईगंज : ऑनलाईन सातबारा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना डोकेदुखी ठरत असल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना हस्तलिखित सातबारा तलाठी कार्यालयामार्फत पुरवावा, अशी मागणी होत आहे. हस्तलिखित सातबारा बंद केल्याने शेतकऱ्यांना सेतू केंद्राचे हेलपाटे मारावे लागत आहेत. यात त्यांची आर्थिक लूट केली जात आहे.

रेगडी-कसनसूर मार्गाची ठिकठिकाणी दुर्दशा

घोट : रेगडी- कसनसूर मार्गाची दुर्दशा झाली असून या मार्गावरील पुलानजीक मोठे खड्डे पडल्याने येथे अपघाताची शक्यता बळावली आहे. मात्र रस्ता व पुलावरील खड्डा बुजविण्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आहे. खड्ड्यांमुळे या मार्गावर किरकाेळ अपघात वाढले आहेत. भविष्यात गंभीर अपघात हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लेटलतीफ कर्मचाऱ्यांवर कारवाई करा

धानोरा : कर्मचाऱ्यांनी शासकीय कार्यालयाच्या वेळेवर येणे गरजेचे असतांनाही बहुतांश कर्मचारी ११ वाजल्याशिवाय येतच नाही. त्यामुळे कारवाई करावी. शासकीय कार्यालयांमध्ये नागरिक येऊन अधिकाऱ्यांची प्रतीक्षा करीत असतात. तालुक्याच्या अतिदुर्गम व ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना कामाशिवाय परतावे लागते. त्यामुळे आर्थिक भुर्दंडसुद्धा साेसावा लागताे.

चामोर्शीतील मोकाट डुकरांचा बंदोबस्त करा

चामोर्शी : शहरात मागील काही दिवसांपासून मोकाट डुकरांची संख्या भरपूर प्रमाणात वाढली आहे. कचरा तसेच सांडपाण्याच्या डबक्यांमध्ये मोकाट डुकरे बसून असतात. त्यामुळे परिसरात रोगराई पसरण्याची शक्यता आहे. या डुकरांपासून बालकांना धोका आहे. त्यामुळे मोकाट डुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

आरमोरी तालुक्यातील गावांना लाईनमनच नाही

आरमोरी : तालुक्यातील अनेक गावांत राईसमिल, आटाचक्की, सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजना व कृषिपंपाना विद्युत पुरवठा करावा लागतो. परंतु अनेक गावांत लाईनमन नसल्याने विद्युत पुरवठा सुरळीत करण्याकडे दुर्लक्ष होत असते. तसेच एकाकडे अनेक गावांचा प्रभार आहे.

भामरागड तालुक्यातील पर्यटनस्थळ दुर्लक्षित

भामरागड : गडचिरोली जिल्हा हा निसर्गाच्या विविध उधळणीने नटलेला आहे. या ठिकाणी शेकडो पर्यटन स्थळे आहेत. भामरागड तालुक्यातील बिनागुंडासह अन्य पर्यटन स्थळाचा विकास अजूनपर्यंत झालेला नाही. त्यामुळे या स्थळांचा विकास करण्याची गरज आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

रस्त्याच्या बाजूची झाडे ठरताहेत धोकादायक

गडचिरोली : जिल्ह्यातील मुख्य रस्त्याच्या बाजूला झुडपे वाढलेली आहेत. त्यामुळे समोरून येणारे वाहने दिसत नाही. यामुळे अनेकवेळा अपघात घडले असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे झुडपे तोडण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. चामोर्शी व आरमोरी मार्गावर काटेरी झुडपे वाढली आहेत.

जिल्ह्यात रोजगाराभिमुख तंत्रशिक्षणाचा बट्ट्याबोळ

आरमोरी : कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी शासनाने औद्योगिक प्रशिक्षण संस्था व इतर तंत्रशिक्षण संस्था निर्माण केल्या असल्या तरी, यातील अभ्यासक्रम पूर्णपणे कालबाह्य झाले आहे. त्याचबरोबर यातील अनेक पदे रिक्त आहेत.

स्नेहनगरात जंतुनाशक फवारणी करा

गडचिरोली : स्थानिक स्नेहनगरात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने येथे फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मागील अनेक दिवसांपासून या वार्डात फवारणी करण्यात आली नाही. त्यामुळे येथे डासांची उत्पत्ती वाढली आहे. पालिका व आरोग्य प्रशासनाने नाल्यांमध्ये जंतूनाशक फवारणी करावी, अशी मागणी होत आहे.

शेकडो नागरिक अस्थमा आजाराने ग्रस्त

गडचिरोली : प्रदूषण, धुळीचे कण, धूम्रपान व आनुवांशिक कारणांमुळे उद्भवणारा अस्थमा आजार जीवघेणा ठरू शकतो. मागील एका वर्षात सहा रुग्णांना या आजारामुळे प्राणास मुकावे लागले होते. दिवसेंदिवस अस्थमा रोगाचा विळखा दिवसेंदिवस वाढत आहे.

रायगट्टा पुलावर कठडे लावण्याकडे दुर्लक्ष

अहेरी : तालुक्यातील रायगट्टानजीक पुलावर कठडे नसल्याने येथे अपघाताची शक्यता बळावली आहे. सदर पूल कमी उंचीचा असल्याने पुलावरून पावसाळ्यात नेहमीच पाणी असते. परिणामी अनेकदा वाहतूक ठप्प होते. त्यामुळे पुलावर कठडे लावण्याची आवश्यकता आहे.

जिल्हा परिषदेत दिव्यांगांची ससेहोलपट

गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या इमारतीत लिफ्टची व्यवस्था करण्यात यावी, असा प्रस्ताव चार वर्षांपूर्वी मांडण्यात आला. मात्र सदर प्रस्तावावर पुढे कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या इमारतीत लिफ्ट बसविण्यात आली नाही. त्यामुळे वृध्द व अपंग नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

विमा नसलेल्या वाहनांवर कारवाईच नाही

भामरागड : कोणतेही वाहन खरेदी केल्यानंतर त्या वाहनाचा विमा काढणे बंधनकारक आहे. वाहनाचा विमा असल्यास अपघातानंतर आर्थिक मदत मिळण्यास वाव असतो. मात्र वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवून वाहन खरेदी सुरू असल्याने रस्त्यावर लाखो वाहने विम्याशिवाय धावत आहेत. शेकडाे वाहने विम्याशिवाय धावत आहेत. प्रशासन कारवाईबाबत सुस्त आहेत.