सौरऊर्जेने कवटाराम गाव उजाळले
By Admin | Updated: April 9, 2017 01:39 IST2017-04-09T01:39:00+5:302017-04-09T01:39:00+5:30
अहेरी पंचायत समिती अंतर्गत जिमलगट्टा भागातील वीज सुविधा नसलेल्या कवटाराम गावातील प्रत्येक कुटुंबाला जिल्हा परिषद

सौरऊर्जेने कवटाराम गाव उजाळले
जिमलगट्टा : अहेरी पंचायत समिती अंतर्गत जिमलगट्टा भागातील वीज सुविधा नसलेल्या कवटाराम गावातील प्रत्येक कुटुंबाला जिल्हा परिषद प्रशासनाकडून सौरऊर्जेच्या प्लेट, बॅटरी व एक बल्बचे वितरण करण्यात आले. सौरऊर्जेच्या माध्यमातून प्रशासनाच्या पुढाकाराने स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतर कवटाराम गावात प्रकाश पडला आहे.
येरमनार ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या कवटाराम गावात वीज सुविधा नाही. गावातील नागरिकांना प्रकाशाची सोय करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने ग्रामपंचायतीला सौरऊर्जेचे साहित्य पाठविले. त्यानंतर प्रत्येक कुटुंबाला सौरऊर्जेचे प्लेट, बॅटरी व फिटींग केलेला एक बल्ब वितरित करण्यात आला. सदर साहित्य वाटप करताना येरमनारचे सरपंच बालाजी गावडे, उपसरपंच पोच्या तलांडी, ग्रामसेविका नंदा कोल्हे, ग्रा.पं. सदस्य विजय आत्राम, बेबी गावडे, लैजा गावडे यांच्यासह गावातील पुरूष व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. (वार्ताहर)