आतापर्यंत दोनच अस्थायी डॉक्टर रूजू
By Admin | Updated: February 3, 2016 01:27 IST2016-02-03T01:27:51+5:302016-02-03T01:27:51+5:30
गडचिरोली जिल्ह्यातील उपजिल्हा व ग्रामीण रूग्णालयात रिक्त असलेल्या ठिकाणी डॉक्टरांची नियुक्ती करण्यासाठी गडचिरोली ....

आतापर्यंत दोनच अस्थायी डॉक्टर रूजू
दोन दिवस उरले : आरोग्य सेवेचा प्रश्न कायमच; १९ डॉक्टर रूजू होतील काय?
अहेरी : गडचिरोली जिल्ह्यातील उपजिल्हा व ग्रामीण रूग्णालयात रिक्त असलेल्या ठिकाणी डॉक्टरांची नियुक्ती करण्यासाठी गडचिरोली येथे २८ जानेवारीला विभागीय आयुक्तांच्या उपस्थितीत डॉक्टर उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. पात्र ठरलेल्या २१ अस्थायी डॉक्टरांची कंत्राटी पध्दतीवर नियुक्ती करण्यात आली. मात्र पाच दिवसांत केवळ दोन अस्थायी डॉक्टर रूजू झाले आहेत. त्यामुळे आरोग्य सेवेतील रिक्त पदाचा प्रश्न कायमच आहे.
गडचिरोली जिल्ह्यात तीन उपजिल्हा व आठ ग्रामीण रूग्णालये आहेत. अहेरी उपजिल्हा रूग्णालयावर पाच तालुक्यातील आरोग्य सेवेचा भार पडत आहे. मात्र येथे केवळ तीनच डॉक्टर कार्यरत आहेत. भूलतज्ज्ञ, अस्थीरोगतज्ज्ञ व अन्य डॉक्टर मिळून अहेरीच्या रूग्णालयात डॉक्टरांची सहा पदे रिक्त आहेत. अहेरी उपजिल्हा रूग्णालयासाठी मुलाखतीनंतर तीन अस्थायी डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांना मुलाखतपत्रही देण्यात आले आहे. मात्र नक्षलप्रभावित जिल्ह्यात डॉक्टर सेवा देण्यास तयार होत नसल्याने डॉक्टरांची पदे रिक्तच आहेत. नियुक्ती झालेले उर्वरित १९ डॉक्टर रूजू होतील काय, असा प्रश्न आहे. (तालुका प्रतिनिधी)