रेतीची अवैध वाहतूक करणारे सहा वाहने जप्त

By Admin | Updated: February 5, 2017 01:27 IST2017-02-05T01:27:54+5:302017-02-05T01:27:54+5:30

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सिरोंचानजीकच्या

Six vehicles carrying illegal transport of sand were seized | रेतीची अवैध वाहतूक करणारे सहा वाहने जप्त

रेतीची अवैध वाहतूक करणारे सहा वाहने जप्त

महसूल विभागाची कारवाई : जानमपल्लीतही सापळा
सिरोंचा : मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सिरोंचानजीकच्या गोदावरी नदी पात्रात व जानमपल्ली येथे धाडसत्र राबवून रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या चार ट्रक व दोन ट्रॅक्टर अशी एकूण सहा वाहने शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास पकडले.
शासकीय अटी व शर्तीचा भंग करून रेती उत्खनन करणारी वाहने पकडल्याची कारवाई सिरोंचाचे तहसीलदार अशोक कुमरे यांच्या नेतृत्वात मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या पथकाने केली. पकडण्यात आलेल्या ट्रकमध्ये टीएस ०८ यूए २१२४, टीएस ८ यूबी ४५६७, एपी २८ टीई ५०६२, टीएस ०२ यूबी ३१३२ या क्रमांकाच्या वाहनांचा समावेश आहे. गोदावरी नदीच्या पात्रातून उत्खनन करून आंतरराज्यीय पुलावरून वाहतूक करण्याच्या तयारीत असताना महसूल प्रशासनाने ही कारवाई केली.
जानमपल्ली चक शिवारात रेतीची अवैध वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर महसूल विभागाने पकडले. एमएच ३३ एफ ४३४८ व टीएस ०२ यूए ८९३२ या क्रमांकाच्या ट्रॅक्टरचा समावेश आहे. जप्त केलेली सर्व वाहने तहसील कार्यालयाच्या आवारात जमा करण्यात आली आहे. याशिवाय विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरच्या टायरमधील हवा काढण्यात आली. कर्मचारी घरी परतल्यावर पुन्हा हवा भरून आरोपींनी पलायन केले. सदर फरार आरोपींना आत्मसमर्पण करण्याची हमी देऊन कारवाई सौम्य करण्यासाठी काही दलाल तहसील कार्यालयाच्या चकरा मारत आहेत. वृत्त लिहिपर्यंत जप्त झालेल्या वाहनांविरूध्द कोणती दंडात्मक कारवाई झाली हे कळू शकले नाही. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Six vehicles carrying illegal transport of sand were seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.