वाहनासह सव्वासहा लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:31 IST2021-05-03T04:31:37+5:302021-05-03T04:31:37+5:30

अहेरी पोलीस व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्तरीत्या आलापल्ली येथील दीपक किराणाच्या गोदामाची तपासणी केली. यावेळी त्या गोदामात २९ हजार ...

Six and a half lakh items including vehicle seized | वाहनासह सव्वासहा लाखांचा मुद्देमाल जप्त

वाहनासह सव्वासहा लाखांचा मुद्देमाल जप्त

अहेरी पोलीस व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्तरीत्या आलापल्ली येथील दीपक किराणाच्या गोदामाची तपासणी केली. यावेळी त्या गोदामात २९ हजार २५० रुपयांची तंबाखू आढळून आली. हा माल चंद्रपूर येथून आला, तसेच तंबाखूजन्य पदार्थ आणून देणारे वाहन शहरातच असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानुसार त्या वाहनाचा शोध घेत आलापल्लीतील मुख्य रस्त्यावर एका वाहनाला अडवून तपासणी केली. दरम्यान, त्या वाहनात २ लाख ५० हजारांची तंबाखू व ३७ हजार ५०० रुपयांची पाच पोती पन्नी आढळून आली. पोलिसांनी वाहनासह एकूण ६ लाख १६ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आलापल्लीतील एका व्यावसायिकावर व वाहन चालकावर अहेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक पडोळे यांच्यासह पोलीस कर्मचारी व मुक्तिपथ तालुका संघटक केशव चव्हाण, तालुका प्रेरक मारोती कोलावार यांनी केली.

===Photopath===

020521\02gad_11_02052021_30.jpg

===Caption===

वाहनाची तपासणी करताना पोलीस कर्मचारी.

Web Title: Six and a half lakh items including vehicle seized