सिरोंचा नगर पंचायतकडून नाका सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 22:38 IST2017-09-04T22:38:00+5:302017-09-04T22:38:24+5:30
सिरोंचा शहरातील मुख्य मार्गावरून वाहनाद्वारे जड वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. दररोज रेती भरलेल्या ट्रकांची वाहतूक केली जाते.

सिरोंचा नगर पंचायतकडून नाका सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : सिरोंचा शहरातील मुख्य मार्गावरून वाहनाद्वारे जड वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. दररोज रेती भरलेल्या ट्रकांची वाहतूक केली जाते. या वाहनांकडून पर्यावरण शुल्क आकारणीसाठी स्थानिक नगर पंचायत प्रशासनातर्फे दोन सप्टेंबर शनिवारपासून येथे नाका सुरू करण्यात आला आहे.
सिरोंचा-आसरअल्ली मार्गावर निजमबाद-जगदलपूर महामार्ग क्रमांक ६३ वर वन विभागाच्या बगिचाजवळ नगर पंचायतीने हा पर्यावरण शुल्क नाका सुरू केला आहे. हजारो वाहनाच्या वाहतुकीमुळे नगर पंचायतीचे होणारे पर्यावरण नुकसान भरून काढण्यासाठी नगर पंचायतीने सदर पर्यावरण शुल्क नाका सुरू केला आहे.
या मार्गावरून रात्रंदिवस २४ तास रेती वाहतुकीची वाहतूक ट्रकांद्वारे होत असते. सदर वाहनांकडून शुल्क वसूल करण्यासाठी सदर नाका २४ तास सुरू राहणार आहे. या नाक्यावर तीन शिप्टमध्ये चार कर्मचºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये नगर पंचायतीचा एक व खासगी म्हणून तीन बेरोजगार युवकांचा समावेश आहे. आसरअल्ली-निजमबाद-जगदलपूर या महामार्गावरून जाणाºया ट्रकांकडून प्रत्येकी १०० रूपयांचे शुल्क आकारण्यात येणार आहे, अशी माहिती सिरोंचा नगर पंचायतीचे मुख्याधिकारी भारत नंदनवार यांनी लोकमतशी बोलताना दिली.
सौंदर्यीकरणासाठी निधी वापरणार
पर्यावरण शुल्क नाक्याच्या माध्यमातून वाहनांकडून दंडाची रक्कम वसूल करण्यात येणार आहे. सदर महसुलातून शहरात बगिचा तयार करणे, झाडे लावणे तसेच इतर सौंदर्यीकरणाच्या कामावर हा निधी खर्च करण्यात येणार आहे. नगर पंचायतीचे या माध्यमातून उत्पन्नही वाढणार आहे.