सिरोंचा रूग्णालयाची धर्मशाळा बेवारस

By Admin | Updated: February 9, 2015 23:13 IST2015-02-09T23:13:30+5:302015-02-09T23:13:30+5:30

सिरोंचा तालुका मुख्यालयात असलेल्या रूग्णालयात येणाऱ्या रूग्णांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी बांधण्यात आलेली धर्मशाळा सध्या बेवारस स्थितीत असल्याचे दिसून येत आहे.

Sironch Hospital's inn | सिरोंचा रूग्णालयाची धर्मशाळा बेवारस

सिरोंचा रूग्णालयाची धर्मशाळा बेवारस

सिरोंचा : सिरोंचा तालुका मुख्यालयात असलेल्या रूग्णालयात येणाऱ्या रूग्णांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी बांधण्यात आलेली धर्मशाळा सध्या बेवारस स्थितीत असल्याचे दिसून येत आहे.
सिरोंचा येथे ग्रामीण रूग्णालयासमोर धर्मशाळेची इमारत आहे. मागील अनेक वर्षांपासून ही इमारत बेवारस स्थितीत असल्याचे दिसून येते. काही काळ सदर धर्मशाळा एका पागल महिलेने आपले निवासस्थान बनविले होते. सध्या ही धर्मशाळा जनावरांचा गोठा झालेली आहे. धर्मशाळेच्या सभोवताल झाडेझुडपे वाढलेले असून सर्वत्र अस्वच्छता पसरलेली आहे. धर्मशाळेची इमारत स्लॅबची असून ती सुस्थितीत आहे. या धर्मशाळेच्या व्यवस्थापनाकडे प्रशासनाच्या कोणत्याही विभागाचे लक्ष नाही. धर्मशाळा इमारतीची आतून बाहेरून स्वच्छता करून सदर इमारत रूग्णांच्या नातेवाईकांना वापरण्यासाठी करारी किंवा भाडे तत्वावर द्यावी, अशी सिरोंचा येथील नागरिकांची मागणी आहे.
रूग्णालयात आसरअल्ली, अंकिसा, झिंगानूर, पातागुडम, मोयाबिन पेठा, रेगुंठा आदी भागातून रूग्ण येतात. त्यांना सिरोंचा रूग्णालयात दाखल केल्यानंतर नातलगांना राहण्यासाठी व्यवस्था नाही. धर्मशाळा सुरू झाल्यास रूग्णांच्या नातेवाईकांना सुविधा उपलब्ध होईल. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Sironch Hospital's inn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.