शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

श्रावणमासात धार्मिक ग्रंथांचे पारायण

By admin | Updated: August 29, 2016 02:15 IST

आरमोरी तालुक्याच्या पळसगाव येथील डोंगरावरील महादेवाच्या मंदिरात तसेच कुरखेडा तालुक्यातील कढोली येथे

कढोलीत ५० वर्षांची परंपरा : पांडव प्रताप, हरिविजय, श्रीराम विजयचे वाचन; महादेव गडावरही कार्यक्रमआरमोरी/ कुरखेडा : आरमोरी तालुक्याच्या पळसगाव येथील डोंगरावरील महादेवाच्या मंदिरात तसेच कुरखेडा तालुक्यातील कढोली येथे श्रावण महिन्यानिमित्त पुराणाचे वाचन करण्यात येत आहे. सदर पुराण ऐकण्यासाठी भाविकांची गर्दी उसळत आहे.पळसगाव येथील महादेवगडावर पुराणाचे वाचन मारोतराव दोनाडकर महाराज करीत आहेत. पुराण वाचनाची सुरूवात ३ आॅगस्टपासून झाली आहे. मारोतराव दोनाडकर महाराज यांच्यासोबतच माणिक कोसरे, टिकाराम मोहुर्ले, सखाराम नखाते, केशव उरकुडे, आत्मराम नाकतोडे, मनोहर राऊत, रघू दुपारे, सुखाजी चव्हारे, आसाराम धनबाते, रामदास कोल्हे, टिकाराम ढोरे, बळीराम राऊत, मंगरू सोनुले, रामजी मानकर, कवडूजी मातोरे, हेमचंद ढोरे, लक्ष्मण नाकाडे आदी उपस्थित राहून पुराण वाचनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत. श्रावण महिना हा पवित्र महिना मानला जातो. महादेवगडावरील मंदिरात शिवलिंग आहे. श्रावण महिन्यातील दर सोमवारी मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळते. डोंगरावर निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या मंदिरात भाविकांची गर्दी श्रावण महिन्यात आणखी वाढते. पुराण वाचनाच्या कार्यक्रमाचा समारोप श्रावण महिन्यानंतर केला जाणार आहे.कुरखेडा तालुक्यातील कढोली येथे धार्मिक ग्रंथाचे पारायण करण्याची परंपरा ५० वर्षांची आहे. श्रावण मास म्हणजे सणाचा महिना दीपपूजा म्हणजेच गुरूपौर्णिमेपासून प्रारंभ झालेल्या श्रावण महिन्याची समाप्ती पिठोली अमावश्या म्हणजेच पोळ्याच्या पाडव्याला होते. यादरम्यान गावागावांत धार्मिक वातावरण असते. कढोली येथे ही परंपरा ५० वर्षांपासून सुरू आहे. या महिन्यात पांडव प्रताप, हरिविजय, रामायण यासारख्या धार्मिक ग्रंथाचे वाचन केले जाते. कढोली येथील स्व. काशिनाथ आकरे हे धार्मिक वृत्तीचे गृहस्थ श्रावण मासाची सुरूवात झाली होती. आपल्या घरी धार्मिक ग्रंथाचे पारायण करीत. काम, क्रोध, मोह, माया, मत्सर या वाईट विचारांचा त्याग करून सन्मार्गाने जगण्याचा मंत्र देणाऱ्या ग्रंथाचे पठण ऐकण्यासाठी गावातील अनेक लोक गोळा होत. एकंदर या महिन्यात धार्मिक वातावरण असायचे. काशिनाथ आकरे यांनी मृत्यूनंतर या धार्मिक ग्रंथाच्या पारायणाची जबाबदारी कढोली येथील प्रतिष्ठीत व्यापारी लक्ष्मण नंदनवार यांच्यावर सोपविली. मागील २० वर्षांपासून ते धार्मिक ग्रंथाचे पारायण करीत आहेत. धार्मिक ग्रंथ माणसाला सन्मार्गाने जीवन जगण्याचा मंत्र देतात, असे लक्ष्मण नंदनवार आवर्जून सर्वांना सांगतात. (शहर प्रतिनिधी)