शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

आरमोरी तालुक्यात युरिया खताचा तुटवडा -युरियासाठी शेतकऱ्यांची वणवण.....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:42 IST

आरमोरी तालुक्यात मुख्य व्यवसाय हा शेतीचा आहे. यावर्षी पावसाने सुरुवातीपासूनच हुलकावणी दिल्यामुळे शेतकऱ्यांनी उशिरा धान पिकाची रोवणी केली. मात्र ...

आरमोरी तालुक्यात मुख्य व्यवसाय हा शेतीचा आहे. यावर्षी पावसाने सुरुवातीपासूनच हुलकावणी दिल्यामुळे शेतकऱ्यांनी उशिरा धान पिकाची रोवणी केली. मात्र रोवणी केलेल्या धानाची पाहिजे त्या प्रमाणात वाढ झाली नाही. काही ठिकाणी हलका प्रतीचा व कमी मुदतीचा धान निसव्यवर आला आहे. धानाची वाढ खुंटल्यामुळे वाढीसाठी युरिया खताची आवश्यकता असल्याने शेतकरी युरिया खतासाठी कृषी केंद्रामध्ये जात आहेत. मात्र, युरिया खत मिळत नसल्यामुळे पिकांचे कसे होईल याची चिंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे.

आरमोरी तालुक्यात कोणतेच उद्योगधंदे नसल्यामुळे आपल्या वडिलोपार्जीत असलेल्या शेतीमध्ये जवळपास १९ हजार शेतकरी मुख्य खरीप धान पीक घेऊन वर्षभराचा कृटुबांचा गाळा चालवित असतात. सध्या धानाच्या वाढीकरिता युरिया रासायनिक खताची अत्यंत आवश्यकता आहे. मात्र शासनाकडून पाहिजे त्या प्रमाणात युरिया खत वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे खासगी कृषी केंद्रधारकांकडून युरिया खताची साठवणूक करून खताच्या प्रचंड किमती वाढवून शेतकऱ्यांची आर्थिक लूटमार मोठ्या प्रमाणात केली जात आहे.

बाॅक्स

जास्त दराने युरियाची विक्री

आरमोरी तालुक्यातील खासगी कृषी केंद्रधारक युरिया खत शासकीय दरापेक्षा जास्त म्हणजे ३५० ते ४०० रुपये या चढ्या दराने विक्री करून शेतकऱ्याला हवालदिल करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

युरिया खत घेताना शेतकऱ्यांना कुठल्या प्रकारचा बिल दिला जात नाही आणि शेतकरी जर विचारले, बिल द्या म्हटले तर त्यांना बिल दिला जात नाही किंवा बिल संपला असे सांगितले जाते.

कोट

सध्या धानाच्या वाढीकरिता युरिया खताची अत्यंत गरज असताना खताचा काळा बाजार खासगी कृषी केंद्रधारकांकडून केला जात आहे. शेतकऱ्याला पर्याय नसल्यामुळे चढ्या भावाने रासायनिक खते विकत घ्यावे लागत आहे. ही मोठी एक शोकांतिका आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या नावाने खताची सबसिडी देते. तरीही बेभाव दराने खताची विक्री केली जाते. याची चाैकशी करण्याची गरज आहे.

दिलीप घोडाम, जिल्हा सचिव आदिवासी काॅंग्रेस