चामोर्शीत कुशल मजुरांचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:42 AM2021-02-20T05:42:20+5:302021-02-20T05:42:20+5:30

चामोर्शी : विविध कुशल कामे करताना बांधकाम करण्यासाठी कुशल मजुरांची आवश्यकता आहे. मात्र कुशल मजुरांची कमतरता आहे. तालुक्यातील अनेक ...

Shortage of skilled labor in Chamorshi | चामोर्शीत कुशल मजुरांचा तुटवडा

चामोर्शीत कुशल मजुरांचा तुटवडा

Next

चामोर्शी : विविध कुशल कामे करताना बांधकाम करण्यासाठी कुशल मजुरांची आवश्यकता आहे. मात्र कुशल मजुरांची कमतरता आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये दरवर्षी कुशल कामगारांचा तुटवडा जाणवतो.

पाणी टाकी परिसरातील सुरक्षा वाऱ्यावर

गडचिरोली : शुद्ध व पुरेसा पाण्याचा पुरवठा करण्यासाठी गावांमध्ये पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले आहे. परंतु या टाकीच्या सुरक्षेसाठी स्थानिक प्रशासन गंभीर नसल्याने या टाकीच्या परिसरात घाण साचून राहत आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

बीएसएनएलचे टॉवर वाढविण्याची मागणी

आष्टी : दुर्गम भागात बीएसएनएलचे अत्यंत कमी टॉवर आहेत. त्यामुळे या परिसरातील भ्रमणध्वनींना कव्हरेज मिळत नाही. बीएसएनएलचे जिल्ह्यात सर्वाधिक ग्राहक असून जास्तीत जास्त टॉवर उभारण्याची मागणी होत आहे.

अनेक पांदण रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात

कमलापूर: शेतीकडे जाणाऱ्या मार्गाला ग्रामीण भागात सगर असे संबोधले जाते. रोजगार हमी योजनेंतर्गत याच रस्त्यांना पांदन रस्ता म्हटले जाते. या पादंन रस्त्यांवर शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे शेतीकडे जाण्याचे मार्ग बंद झाले आहेत.

रविवारच्या बाजारात मोकाट जनावरांचा हैदोस

गडचिरोली : दर रविवारी शहरात भरणाऱ्या बाजारात मोकाट गुरांचा हैदोस असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या बाजारात खरेदीसाठी नागरिक मोठ्या संख्येने येत असतात. विक्रेत्यांनी ठेवलेल्या भाजीवरही त्यांची नजर चुकवून ताव मारतात.

खासगी ट्रॅव्हल्सचा व्यवसाय वाढला

गडचिरोली : राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली आगाराच्या नादुरूस्त बसगाड्यांमुळे चंद्रपूर व नागपूर मार्गावर खासगी प्रवाशी वाहनांचा व्यवसाय प्रचंड प्रमाणात वाढला आहे. खासगी नव्या ट्रॅव्हल्स बसेस चालविल्या जात आहे. एसटी बसगाडया सुटण्यास विलंब होत असतो.

कॉम्प्लेक्स मार्गावर अंधाराचे साम्राज्य

गडचिरोली : येथील इंदिरा गांधी चौकातून कॉम्प्लेक्स भागातील जिल्हा रूग्णालयाकडे जाणाºया चंद्रपूर मार्गावर रात्रीच्या सुमारास अंधार असतो. त्यामुळे वाहनधारक व सायकलस्वारांना मोठी अडचण निर्माण होते.

Web Title: Shortage of skilled labor in Chamorshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.