विद्यार्थ्याने बनविला लघु चित्रपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 22:10 IST2018-05-30T22:10:07+5:302018-05-30T22:10:07+5:30

स्थानिक शहरातील विद्यार्थी अनमोल मुनगंटीवार याने लघुचित्रपट बनविला असून पोएटिक लिरीकल व्हिडिओच्या सादरीकरणाचा शुभारंभ आ. डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते मंगळवारी स्थानिक प्रेस क्लब भवनात करण्यात आला.

Short film made by the student | विद्यार्थ्याने बनविला लघु चित्रपट

विद्यार्थ्याने बनविला लघु चित्रपट

ठळक मुद्देआमदारांची उपस्थिती : काव्यमय व्हिडीओचे सादरीकरण

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : स्थानिक शहरातील विद्यार्थी अनमोल मुनगंटीवार याने लघुचित्रपट बनविला असून पोएटिक लिरीकल व्हिडिओच्या सादरीकरणाचा शुभारंभ आ. डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते मंगळवारी स्थानिक प्रेस क्लब भवनात करण्यात आला.
यावेळी जि. प. अध्यक्ष योगीता भांडेकर, गडचिरोलीच्या नगराध्यक्ष योगीता पिपरे, नगरसेवक प्रमोद पिपरे, रवींद्र ओल्लालवार, सुधाकर येनगंधलवार आदी उपस्थित होते.
अनमोल मुनगंटीवार याने पॉलिटेक्निकचे शिक्षण पूर्ण करून आता अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षाला तो शिकत आहे. अनमोल याने एक कल्पनात्मक कविता लिहून विशाल महाले व सूजीता सेलोकर यांच्यावर चित्रित ‘पोएटिक लिरीकल व्हिडिओ तयार केला. या व्हिडिओचे आ. डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते पत्रकार भवनात सादरीकरण करण्याची सुरूवात करण्यात आली.

Web Title: Short film made by the student