शॉर्ट सर्किटने ग्रामपंचायतीला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 22:57 IST2019-07-17T22:57:02+5:302019-07-17T22:57:28+5:30

तालुक्यातील चुडीयाल ग्रामपंचायतीच्या इमारतीला बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास शॉर्टसर्कीटमुळे आग लागली. या आगीत ग्रामपंचायतीमधील साहित्य व महत्त्वाचे दस्तावेज जळून खाक झाले. यामध्ये जवळपास दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

Short circuit Gram Panchayat fire | शॉर्ट सर्किटने ग्रामपंचायतीला आग

शॉर्ट सर्किटने ग्रामपंचायतीला आग

ठळक मुद्देचुडीयाल येथील घटना : दोन लाखांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : तालुक्यातील चुडीयाल ग्रामपंचायतीच्या इमारतीला बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास शॉर्टसर्कीटमुळे आग लागली. या आगीत ग्रामपंचायतीमधील साहित्य व महत्त्वाचे दस्तावेज जळून खाक झाले. यामध्ये जवळपास दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
शॉर्टसर्कीटने लागलेल्या आगीमुळे ग्रामपंचायत इमारतींमधील अपंगाची सायकल, सहा सिलिंग फॅन, १० एलईडी बल्ब, २० सीएफएल बल्ब, एक व्हिलचेअर, जिल्हा परिषद शाळेची एलईडी टीव्ही, स्टिल ग्लास आदी साहित्य जळून खाक झाले. याबाबतची माहिती पोलीस स्टेशन व पंचायत समितीला देण्यात आली आहे.

Web Title: Short circuit Gram Panchayat fire