दुकानदाराने केली ग्राहकाची हत्या

By Admin | Updated: September 24, 2014 23:34 IST2014-09-24T23:34:42+5:302014-09-24T23:34:42+5:30

अहेरी तालुका मुख्यालयापासून १३ किमी अंतरावरील गुड्डीगुडम येथे १० रूपयांच्या फाटक्या नोटेवरून वाद झाल्याने किराणा दुकानदाराने ग्राहकाची हत्या केल्याची घटना २० सप्टेंबर रोजी ४.३० वाजताच्या

Shopkeeper kills the customer's murder | दुकानदाराने केली ग्राहकाची हत्या

दुकानदाराने केली ग्राहकाची हत्या

अहेरी : अहेरी तालुका मुख्यालयापासून १३ किमी अंतरावरील गुड्डीगुडम येथे १० रूपयांच्या फाटक्या नोटेवरून वाद झाल्याने किराणा दुकानदाराने ग्राहकाची हत्या केल्याची घटना २० सप्टेंबर रोजी ४.३० वाजताच्या सुमारास घडली. पोलिसांनी तक्रारीवरून आरोपी राजू दशरथ गांगरेड्डीवार (४५) याला मंगळवारी ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक केली.
गणपती लच्छमा भोयर रा. गुड्डीगुडम असे मृतकाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, गणपती लच्छमा भोयर हा इसम राजू दशरथ गांगरेड्डीवार यांच्या गावातील किराणा दुकानात १० रूपयांची फाटकी नोट घेऊन २० सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास किराणा साहित्य घेण्यास गेला होता. दरम्यान, भोयर व गांगरेड्डीवार या दोघांमध्ये १० रूपयाच्या फाटक्या नोटेवरून वाद झाला. आरोपी राजू गांगरेड्डीवार याने दुकानात असलेल्या लाकडी दांड्याने भोयर यांच्या पोटावर व गुप्तांगावर वार केला. यात भोयर हा गंभीर जखमी झाला. दरम्यान, त्याचा २२ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. मृतक गणपती भोयर हा एकटाच राहत असून मोलमजुरी करून वास्तव्य करीत होता. गणपती भोयर याची पत्नी इमला गणपती भोयर (४२), मुलगा नागेश गणपती भोयर (२२), विवाहित मुलगी राजेश्वरी तमय्या पाले व श्रीदेवी रमेश चिलकाटील हे तिघेजण गणपतीशी पटत नसल्याने आसरअल्ली येथे राहत होते.
घटनेप्रसंगी नातेवाईक विलास व्यंकटी भोयर, गंगाराम लच्छमा गावतुरे, मृतकाचा भाऊ बापू अंकलू भोयर व गुड्डीगुडम येथील ग्रामस्थ उपस्थित होते. सदर घटनेची तक्रार राजाराम खांदला येथील उपपोलीस ठाण्यात मुलगा नागेश गणपती भोयर यांनी २२ सप्टेंबर रोजी दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी राजू गांगरेड्डीवार याचेवर ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल केला. मृतदेहाचे अहेरी उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Shopkeeper kills the customer's murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.