मार्र्कं डादेव यात्रेसाठी दुकानदार डेरेदाखल
By Admin | Updated: March 4, 2016 01:27 IST2016-03-04T01:27:07+5:302016-03-04T01:27:07+5:30
चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडादेव येथे महाशिवरात्रीच्या पर्वावर ७ मार्चपासून जत्रेला सुरुवात होत आहे.

मार्र्कं डादेव यात्रेसाठी दुकानदार डेरेदाखल
मार्र्कं डादेव : चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडादेव येथे महाशिवरात्रीच्या पर्वावर ७ मार्चपासून जत्रेला सुरुवात होत आहे. जत्रा आणखी सहा पाच दिवसांवर असली तरी दुकानदार डेरेदाखल झाले असून सामान लावण्याची तयारी सुरू केली आहे.
मार्र्कंडादेव येथील महाशिवरात्रीची जत्रा संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे. या जत्रेसाठी विदर्भातील तसेच छत्तीसगड व तेलंगणा राज्यातील हजारो भाविक येतात. ७ मार्चपासून या जत्रेला सुरुवातही होणार आहे. पहिले चार ते पाच दिवस भाविकांची प्रचंड गर्दी उसळते. जत्रेच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात साहित्याची विक्री होते. त्याचबरोबर काही करमणुकीचे साधनेही या ठिकाणी चांगली कमाई करून देतात. त्यामुळे दुकानदारांनी जत्रेच्या दहा दिवसांपूर्वीच मार्र्कंडादेव येथे डेरेदाखल होऊन आपली जागा आरक्षित केली आहे. विशेषकरून झुला, मिना बाजार, चित्रपटगृह यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात जागेची गरज भासते. त्याचबरोबर संपूर्ण साहित्य लावण्यासाठी दहा ते बारा दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे दुकानदारांनी साहित्य जोडण्यास सुरुवात केली आहे.
वाहनांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मागील वर्षी पोलीस विभागाने मार्र्कं डापासून अर्धा किमी अंतरावरच दुचाकी व चारचाकी वाहने थांबविण्यास सुरुवात केली होती. परिणामी वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत झाली. (वार्ताहर)