नेमबाजीत पोलीस हवालदारास सुवर्णपदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 00:02 IST2017-10-11T00:01:55+5:302017-10-11T00:02:52+5:30
राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ५ दौंड येथे ४ ते ७ आॅक्टोबरदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या १८ व्या महाराष्टÑ राज्य पोलीस रायफल रिव्हॉल्हवर, पिस्टल व कार्बाईन नेमबाजी स्पर्धेत गडचिरोली जिल्हा पोलीस दलात ....

नेमबाजीत पोलीस हवालदारास सुवर्णपदक
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ५ दौंड येथे ४ ते ७ आॅक्टोबरदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या १८ व्या महाराष्टÑ राज्य पोलीस रायफल रिव्हॉल्हवर, पिस्टल व कार्बाईन नेमबाजी स्पर्धेत गडचिरोली जिल्हा पोलीस दलात पोलीस हवालदार पदावर कार्यरत असलेल्या संजय अशोक हजारे यांनी सुवर्णपदक पटकाविला आहे.
५० गज एमी-५ निलिंग पोजिशन या स्पर्धा प्रकारात संजय हजारे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. याबाबत राज्य राखीव पोलीस दल गट क्र. ५ दौंड यांच्या हस्ते हजारे यांना सुवर्णपदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सदर स्पर्धा राज्यस्तरीय असल्याने या स्पर्धेत शेकडो पोलिसांनी सहभाग घेतला होता. हजारे यांच्या यशाबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक (अभियान) डॉ. महेश्वर रेड्डी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक (प्रशासन) महेंद्र पंडित, अतिरिक्त पोलीस अधीक्षक (नक्षल व क्राईम) हरी बालाजी, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे, पोलीस उपअधीक्षक प्रदीप चवगावकर यांनी कौतुक केले आहे. याबद्दल त्यांचा सत्कारही करण्यात आला.