जिल्हाभरात साजरा हाेणार शिवस्वराज्य दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:26 IST2021-06-05T04:26:38+5:302021-06-05T04:26:38+5:30
दिनांक ६ जूनला सकाळी ९ वाजता सर्व ठिकाणी शिवस्वराज्यदिन साजरा करण्यात येणार आहे. यावेळी शासनाने दिलेल्या संहितेचा अवलंब केला ...

जिल्हाभरात साजरा हाेणार शिवस्वराज्य दिन
दिनांक ६ जूनला सकाळी ९ वाजता सर्व ठिकाणी शिवस्वराज्यदिन साजरा करण्यात येणार आहे. यावेळी शासनाने दिलेल्या संहितेचा अवलंब केला जाणार आहे. भगवा स्वराज्य ध्वज आणि शिवश्क राजदंड स्वराज्य गुढी
उभारून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना उजाळा या दिवशी देण्यात येणार आहे. यावेळी राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत म्हणून कार्यक्रमाची सांगता केली जाणार आहे. त्याच दिवशी सूर्यास्ताला राजदंड स्वराज्य गुढी खाली घेण्यात येणार असल्याचे शासनाने नमूद केलेल्या संहितेत सूचना देण्यात आल्या आहेत.
सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर जिल्हा ५ जून राेजी दौऱ्यावर येत आहेत. ६ जूनला त्यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषदेमध्ये शिव स्वराज्य दिन कार्यकम आयोजित करण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा ६ जून १६७४ या दिवशी रायगडावर राज्याभिषेक झाला होता.