शिवसेनेतर्फे आरमोरीत शाळा-महाविद्यालय बंद आंदोलन
By Admin | Updated: August 18, 2015 01:32 IST2015-08-18T01:32:16+5:302015-08-18T01:32:16+5:30
जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करण्यात यावे, जिल्ह्यात निवड मंडळ लागू करून नोकरभरतीत

शिवसेनेतर्फे आरमोरीत शाळा-महाविद्यालय बंद आंदोलन
आरमोरी : जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करण्यात यावे, जिल्ह्यात निवड मंडळ लागू करून नोकरभरतीत स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यात यावी, पेसा कायद्यातील गैरआदिवासींवर होणाऱ्या जाचक अटी रद्द करण्यात याव्या, आदी मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने सोमवारी आरमोरी शहरात शाळा महाविद्यालय बंद आंदोलन करण्यात आले. दरम्यान शहरातील शाळा महाविद्यालय कडकडीत बंद होते.
या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, उपजिल्हा प्रमुख अविनाश गेडाम, युवा सेना जिल्हा प्रमुख चंदू बेहरे यांनी केले. शिवसेना व युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी शहरातील शाळा महाविद्यालयात परिसरात फिरून सर्व शाळा बंद करण्यास भाग पाडले. त्यानंतर पदाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयात तहसीलदार मनोहर वलथरे यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी जि.प. सदस्य छाया कुंभारे, सुनंदा आतला, कालिंदा खरवडे, आप्पा सोनकुवर, किशोर गोंदोळे, माणिक भोयर, उमेश गजपुरे, भूषण सातव, भिमराव ढवळे, मधूसुदन चौधरी, भारती चोपकार, मिनाक्षी मने उपस्थित होते. (वार्ताहर)
बुधवारी चक्काजाम
४गैरआदिवासीच्या विविध मागण्यांसाठी आरमोरी येथे बुधवारला वडसा टी पार्इंट मार्गावर चक्काजाम व जेलभरो आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती सुरेंद्रसिंह चंदेल यांनी दिली आहे.