शिवसैनिकांची सडक योजना कार्यालयावर धडक
By Admin | Updated: February 19, 2016 01:44 IST2016-02-19T01:44:47+5:302016-02-19T01:44:47+5:30
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या निमगाव- मोहटोला रस्त्याचे खडीकरण- डांबरीकरण व उंच पुलाचे बांधकाम करावे,

शिवसैनिकांची सडक योजना कार्यालयावर धडक
गडचिरोली : अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या निमगाव- मोहटोला रस्त्याचे खडीकरण- डांबरीकरण व उंच पुलाचे बांधकाम करावे, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने उपविभागीय अभियंता एन. आर. चिंतावार यांना गुरूवारी दोन तास घेराव घालून आंंदोलन करण्यात आले.
निमगाव- मोहटोला मार्ग धानोरा व गडचिरोली तालुक्यांना जोडणारा मुख्य रस्ता आहे. मात्र सदर मार्गाचे खडीकरण व डांबरीकरण अनेक वर्षांपासून रखडले आहे. शिवाय या मार्गावरील पुलांची उंची कमी असल्याने पावसाळ्यात पुलावरून पाणी वाहत असते. परिणामी नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांनाही त्रास होतो. विद्यार्थ्यांना अनेकदा शिक्षणापासून वंचित राहावे लागते. सध्या या मार्गावरील गिट्टी पूर्णत: उखडल्याने बसफेऱ्याही बंद पडल्या आहेत.
याबाबीचे गांभीर्य ओळखून शिवसेनेच्या वतीने उपविभागीय अभियंत्यांना घेराव घालण्यात आला. येत्या मार्चपर्यंत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत सदर रस्त्याचे काम करण्यात येईल, असे आश्वासन अधीक्षक अभियंत्यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख अरविंद कात्रटवार, उपशहर प्रमुख ज्ञानेश्वर बगमारे, युवा सेना तालुका प्रमुख तेजस नरड, उपतालुका प्रमुख यादव लोहंबरे, सरपंच ईश्वर दुग्गा, सुनील नक्षिणे, योगेश कुडवे, संतोष लांजेवार, विशाल देशमुख, प्रफुल चापले, राहूल सोरते, हरबा दाजगाये, प्रमोद बोबाटे, जीवन चापले, राजेंद्र वरखडे, विलास दाजगाये, माधव भुरसे, सुरेश होळी, अविनाश झोडे, महेश झोडे, रवींद्र मडावी, महेश भुरसे, प्रशांत देवगिरकर, आशिष नक्षिणे, आकाश टेकाम, जगदीश मेश्राम, राजू भांडेकर, योगेश लेनगुरे, खुशाल साखरे, मुखरू सोनबावणे, आशिष सोरते, वसंत मडावी, महेश भोयर, नामदेव कुमरे, राजू जवादे, प्रशांत सोरते, सोनु लाडे व शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)