घाेट येथे शिवजयंती उत्साहात साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:26 IST2021-02-22T04:26:31+5:302021-02-22T04:26:31+5:30
घाेट : वीर छत्रपती शिवाजी युवा मित्र संघटनेच्या वतीने पेटतळा येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेनेचे पदाधिकारी ...

घाेट येथे शिवजयंती उत्साहात साजरी
घाेट : वीर छत्रपती शिवाजी युवा मित्र संघटनेच्या वतीने पेटतळा येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेनेचे पदाधिकारी विजय शृंगारपवार यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी पेटतळाचे पोलीस पाटील जयेंद्र बर्लावार होते. प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू कावळे, शिवसेना संघटक नंदू कुमरे, सरपंच शोभा कन्नाके, उपसरपंच ओमप्रकाश बर्लावार, माजी सरपंच रमेश कन्नाके, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण गेडाम, सावित्री पेंदाम, मुख्याध्यापक वासुदेव कुनघाडकर, योगराज मडावी, महेश ओल्लालवार, पत्रकार हेमंत उपाध्ये आदी उपस्थित होते. सर्वप्रथम शिवाजी चौकात भगवा ध्वज फडकविण्यात आला, तसेच शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. शिवाजी महाराजांचे विचार संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहेत. गावाच्या विकासासाठी शिवाजी महाराजांचे विचार अंगीकारावेत, असे प्रतिपादन विजय शृंगारपवार यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन सुरेश चौधरी यांनी केले, तर आभार परितोष हलधर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष गंगाधर तुंकलवार, दुर्गम मुसद्दीवार, संभाजी तुंकलवार, दिलीप मुसेद्वीवार, दिगांबर आत्राम, राजू चौधरी, सुजित चौधरी, भूपेश बर्लावार, संतोष चौधरी, विनोद तुंकलवार, प्रकाश तोकलवार, रेवत कन्नाके, नरेश पेंदाम, प्रवीण सिडाम यांनी सहकार्य केले.
घोट येथे बसस्थानक चौकाचे नामकरण
घोट येथे १९ फेब्रुवारी रोजी प्रथमच शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. येथील बसस्थानक चौकाचे छत्रपत्री शिवाजी महाराज चौक, असे नामकरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच विनय बारसागडे हाेते. उद्घाटन संजय वडेट्टीवार यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. राम वासेकर, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष मारोती दुधबावरे, तर प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच साईनाथ नेवारे, वसंत दुधबावरे, घोटचे क्षेत्र सहायक विकास लटारे, अशोक पोरेड्डीवार, विलास गण्यारपवार, अशोक कांचो, विलास उइके, आशीफ सय्यद, बाबू भोयर, रामदास कामेलवार, पोलीस पाटील अविनाश वडेट्टीवार, गुरुदास वैरागडे, गीत उपाध्ये, अनिल पोरेड्डीवार, बंडू भांडेकर, नानू उपाध्ये, दिनकर लाकडे उपस्थित होते. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची रथावर शोभायात्रा काढून गावातील मुख्य मार्गाने फिरविण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाबू भाेयर, तर संचालन तलाठी एन.एस. अतकारे यांनी केले. आभार मुन्ना सिडाम यांनी मानले. यशस्वीतेसाठी समीर भोयर, केवल गंधेवार, दीपक दुधबावरे, विक्की चलाख, आरीफ सय्यद, प्रमोद बावणे, आशिष मेश्राम, दीपक लाकडे, हेमंत पत्रे, निखिल शेडमेक, शंकर मुजुमदार, लहू वेलादी, रितिक कोडापे, प्रदीप नैताम, संचित येनगंटीवार, प्रमोद मत्ते, सलीम शेख, राहुल पिपरे, देव जुवारे, रूपेश नैताम यांनी सहकार्य केले.
नवाेदय हायस्कूल घाेट : येथे शिवजयंतीनिमित्त अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष विलास निंबाेरकर उपस्थित हाेते. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेमध्ये सर्वच जाती-धर्मांच्या लोकांना स्थान देऊन समतेचे राज्य स्थापन केले हाेते, असे प्रतिपादन निंबोरकर यांनी केले. यावेळी मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी उपस्थित हाेते.