सावलखेडा येथे शिवजयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:08 IST2021-02-21T05:08:36+5:302021-02-21T05:08:36+5:30
वैरागड : कुरखेडा तालुक्यातील सावलखेडा येथे शुक्रवारी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला हारार्पण ...

सावलखेडा येथे शिवजयंती साजरी
वैरागड : कुरखेडा तालुक्यातील सावलखेडा येथे शुक्रवारी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला हारार्पण करण्यात आले. दरम्यान, शिवाजी महाराजांच्या चरित्रावर व्याख्यानातून माहिती देण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. प. सदस्य भाग्यवान टेकाम होते. याप्रसंगी विलास गावंडे, पुरुषोत्तम ठाकरे, दौलत धोटे, प्रा. प्रदीप बोडणे, भाऊराव राऊत, देवांगणा घोडमारे, मीना आलाम, प.सं. सदस्य वर्षा कोकोडे, उपसरपंच सावित्री राऊत, लक्ष्मण मेश्राम, कीर्तीलाल दडमल, कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामसेवक दिवाकर निंदेकर, संचालन प्रा. पुरुषोत्तम राऊत ता आभार प्रकाश चौधरी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शंकर चौधरी, मोतीलाल धोटे, दशरथ राऊत, सचिन राऊत, काशिनाथ दोनाडकर, भाऊराव तिजारे, दिनेश धोटे, मनोज धोटे, दीपक राऊत, श्रीराम दाणे, त्र्यंबक राऊत, माणिक राऊत, सुधाकर धोटे, संतोष कुथे, सुनील खरकाटे, समीर खरकाटे, रामदास ठाकरे तसेच गुरुदेव नवयुवक मंडळ सावलखेडाच्या सदस्यांनी सहकार्य केले.