शिवजयंती ठिकठिकाणी साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:54 IST2021-02-23T04:54:48+5:302021-02-23T04:54:48+5:30
प्रियंका हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय कनेरी : येथे शिवजयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य संजय नार्लावार हाेते. प्रमुख अतिथी म्हणून चंदा ...

शिवजयंती ठिकठिकाणी साजरी
प्रियंका हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय कनेरी : येथे शिवजयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य संजय नार्लावार हाेते. प्रमुख अतिथी म्हणून चंदा नंदनवार, डी.के. कांबळे, व्ही.डब्ल्यू. हुलके, एस.एल. गायकवाड, किशाेर गेडाम उपस्थित हाेते. प्राचार्य संजय नार्लावार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन आर. ए. बैस, तर आभार के.आर. पिल्लारे यांनी मानले.
मानापूर / देलनवाडी : देलनवाडी येथे शिवसाम्राज्य प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्राचार्य डी. के. मेश्राम हाेते. प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती सदस्य किरण म्हस्के, सरपंच शुभांगी मसराम, ग्रामपंचायत सदस्य अश्विनी गरमळे, चंद्रकला कांबळे, मनाेज अंबादे, उपसरपंच त्रिलाेक गावतुरे, तंमुस अध्यक्ष हरबाजी घाेडमारे, रमेश भैसारे, अनिल ठवरे, बाळकृष्ण आखाडे, दिलीप कुमरे, दिगांबर धाईत उपस्थित हाेते. शिवाजी महाराज म्हणजे मानवतेचा जिवंत इतिहास आहे. हिंदवी स्वराज्य स्थापन करून रयतेवर प्रेम करणारे ते राजे हाेते, असे गाैरवाेद्गार उपस्थित मान्यवरांनी काढले. प्रास्ताविक हेमराज टेंभुर्णे, संचालन नरेश वाघ तर आभार दानेश हर्षे यांनी मानले.