विहीरगाव ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:36 IST2021-02-16T04:36:51+5:302021-02-16T04:36:51+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क गडचिराेली : गडचिराेली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व संपर्कप्रमुख ...

Shiv Sena dominates Vihirgaon Gram Panchayat | विहीरगाव ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे वर्चस्व

विहीरगाव ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे वर्चस्व

लाेकमत न्यूज नेटवर्क

गडचिराेली : गडचिराेली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व संपर्कप्रमुख किशाेर पाेद्दार यांच्या सहकार्याने शिवसेना उपजिल्हा प्रमुख अरविंद कात्रटवार यांच्या नेतृत्वात गडचिराेली तालुक्यातील विहीरगाव ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे वर्चस्व निर्माण झाले आहे.

सरपंचपदाच्या निवडणुकीत शिवसेनासमर्पित उमेदवार ज्याेती तलांडे यांची सरपंचपदी निवड झाली, तर उपसरपंचपदी अनिल काेठारे यांची निवड झाली. शिवसेनेच्या वतीने सरपंच व उपसरपंचपद निवडीचा जल्लाेष करण्यात आला. यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख अरविंद कात्रटवार, तालुकाप्रमुख गजानन नैताम, अमाेल मेश्राम, संजय बाेबाटे, स्वप्निल खांडरे, लिकेश लाेहंबरे, राहुल साेरते, तसेच विहीरगाव ग्रा.पं.चे नवनिर्वाचित सदस्य निखिल बारसागडे, पूनम मानकर, ज्याेती तलांडे, कविता माेहुर्ले, आशा सिडाम व ताई चिंतलवार, आदी उपस्थित हाेते.

Web Title: Shiv Sena dominates Vihirgaon Gram Panchayat