मुलचेरा येथे शिवसंपर्क अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:24 IST2021-07-20T04:24:55+5:302021-07-20T04:24:55+5:30

मुलचेरा येथील कार्यक्रमाला उपजिल्हा प्रमुख अरुण धुर्वे, महिला आघाडीच्या पौर्णिमा इस्टाम, तालुका प्रमुख गौरव बाला, काशिनाथ कन्नाके, बंगाली आघाडी ...

Shiv Sampark Abhiyan at Mulchera | मुलचेरा येथे शिवसंपर्क अभियान

मुलचेरा येथे शिवसंपर्क अभियान

मुलचेरा येथील कार्यक्रमाला उपजिल्हा प्रमुख अरुण धुर्वे, महिला आघाडीच्या पौर्णिमा इस्टाम, तालुका प्रमुख गौरव बाला, काशिनाथ कन्नाके, बंगाली आघाडी जिल्हाप्रमुख दीपक बिस्वास, युवासेना तालुका प्रमुख राजेश गुंतीवार उपस्थित हाेते. यावेळी जिल्हाप्रमुख रियाज शेख यांनी शिवसेनेचे संघटन वाढवून पक्षाची ध्येयधोरणे घराघरात पोहाेचवा, असे आवाहन केले. तसेच मुलचेरा येथे १७ प्रभाग व बुथनिहाय प्रमुखांची नियुक्ती करून व युवा सेनेचे कार्यकारिणी गठित करण्यात आली. कार्यक्रमादरम्यान मुलचेरा आणि गणेशनगर येथील अनेक युवकांनी जिल्हा प्रमुख शेख यांच्याकडून शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी संजय गांधी निराधार योजना समितीचे तालुकाध्यक्ष संजय मंडल, मुकेश ठाकूर, उत्तम बिस्वास, सुकुमार गायली, सतीश कर्मकार. सुरजित कर्मकार. सचिन आरके, अमित अधिकारी, राजू मंडल, सुकांत बाईन, राहुल सरकार, नीताई कर्मकार, संदीप रॉय, संजीव घरामी, राजू मंडल व शिवसैनिक उपस्थित होते.

180721\0647img-20210718-wa0083.jpg

मुलचेरा येथे शिवअभियान

Web Title: Shiv Sampark Abhiyan at Mulchera