जिल्ह्यात ठिकठिकाणी शिवजयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:26 IST2021-02-22T04:26:21+5:302021-02-22T04:26:21+5:30
महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय आरमाेरी : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आरमाेरी येथे साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी प्रा. ...

जिल्ह्यात ठिकठिकाणी शिवजयंती साजरी
महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय आरमाेरी : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आरमाेरी येथे साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी प्रा. भाऊराव गाेरे हाेते. प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य साईनाथ अद्दलवार, उपप्राचार्य वासुदेव आंबाेरकर, नारायण कावळे, सुधाकर बाेरकर व कर्मचारी उपस्थित हाेते.
कर्मवीर दादासाहेब देवतळे महाविद्यालय चामाेर्शी : येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी प्राचार्य डाॅ. डी.जी म्हशाखेत्री हाेते. याप्रसंगी प्रा. डाॅ. राजेंद्र झाडे, प्रा. डाॅ. भूषण आंबेकर, प्रा. डाॅ. रमेश बावणे, प्रा. दीपक बाबणवाडे, प्रा. वंदना थुटे, प्रा. वैशाली कावळे, प्रा. हर्षा देशमुख, मेघा पत्रे, नीलेश कुनघाडकर, चंद्रपाल राठाेड, देवाजी धाेडरे, रवी कऱ्हाडे उपस्थित हाेते.
महात्मा गांधी विद्यालय देसाईगंज : येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी जयंतराव हटवार हाेते. प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सदस्य ह.बा. रहाटे, एल.बी. पिलारे, मुख्याध्यापक जे.एन. बुद्धे, उपमुख्याध्यापक डी. जी. भूपाल व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित हाेते. मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. सूत्रसंचालन सुनीता मारुडवार यांनी केले.
शिवाजी महाविद्यालय गडचिराेली : येथे रासेयाे विभागाच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी प्राचार्य भूपेश चिकटे हाेते. प्रमुख अतिथी म्हणून डाॅ. एम.जे. मेश्राम, रासेयाे कार्यक्रम प्रमुख जे.जी. उईके, एस.पी. ढाेमणे, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. आर.एस. काेल्हे उपस्थित हाेते. याप्रसंगी प्राचार्य चिकटे यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर विचार व्यक्त केले. यशस्वितेसाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
श्री. किसनराव खाेब्रागडे कला-वाणिज्य महाविद्यालय वैरागड : येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी प्राचार्य डाॅ. सचिन खाेब्रागडे हाेते. प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डी.एस.जनबंधू, प्रा. व्ही.एम. हलमारे, प्रा. एस. बी. खाेब्रागडे, प्रा.ए.जी.नैताम उपस्थित हाेते. यावेळी प्राचार्य खाेब्रागडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर विचार व्यक्त केले. प्रास्ताविक प्रा. पी.व्ही.म्हशाखेत्री, सूत्रसंचालन प्रा. व्ही.एम. हलमारे तर आभार प्रा. डी.एन.जनबंधू यांनी मानले, कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी के. आय. लेनगुरे, एस.एन. पाटील, जी.बी.बाेधनकर, संदेश चिलबुले यांनी सहकार्य केले.
ग्रामपंचायत वसा : येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला सरपंच मुखरू झोडगे, उपसरपंच वर्षा बाबनवाडे, ग्रा.पं.सदस्य अंकुश इंगळे, प्रीतेश अंबादे, शिवराम नैताम, मंगला भोयर, मीराबाई शेंडे, पिंगला शिवणकर, गोविंदा बाबनवाडे, भास्कर मुंगाते, महेश नेवारे, अमोल भांडारकर उपस्थित हाेते.
देसाईगंज : टायगर ग्रुप व छत्रपती शिवाजी क्लबद्वारा ब्रम्हपुरी-लाखांदूर टी पाइंट चौकातील शिवाजी महाराजांच्या छायाचित्राचे पूर्णाकृती होर्डिंग व महात्मा जाेतिबा फुले आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कटआऊट लावण्यात आले. माेठ्या उत्साहात जयंती उत्सव साजरा करण्यात आला. अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कौसल्या निवासी मतिमंद विद्यालय गडचिरोली : येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यास आली. याप्रसंगी मुख्याध्यापक प्रशांत जोशी, विशेष शिक्षक अरविंद टाकसाळे, तनुजा मोहिते, उमेश देशमुख, विलास आष्टेकर, वीणा बोधनकर, प्रमोद चिल्वरवार, अंजना शिंदे, मंगेश मस्के, राजू भोमले आदी कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार राजू भोमले यांनी केले.
कुरखेडा येथे रक्तदान करून शिवजयंती केली साजरी
सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबिर घेण्यात आले. यात २९ जणांनी रक्तदान केले. यामध्ये प्रशांत हटवार, लक्ष मोहबंसी, आशिष चौधरी, लीलाधर नंदनवार, अमित कोरेटी, डॉ.पूर्णानंद नेवारे, प्रांजल धाबेकर, नितीन कवाडकर, दिवांशू कांबळे, दीक्षित बेहार, रूपेश बोरेकर, निखिल चौधरी, राकेश देशमुख, अभय चंदेल, अनिकेत आकरे, प्रतीक दरवडे, निखिल हिडामी, शोएब पठाण, दुमेश बहेटवार, गौतम बोदेले, आदित्य पोरेटी, हरीश टेलका, राहुल गिरडकर, आशू दांडेकर, रजत ठाकरे, विशाल पारधी, गोपाल वैरागडे, प्रणय मडावी, ईश्वर ठाकरे यांचा समावेश आहे. दरम्यान, रक्तदाब, रक्तगट तसेच हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली.
संजीवनी उच्च प्राथमिक शाळा तथा संजीवनी विद्यालय, नवेगाव : येथे शिवजयंती सामाजिक अंतर ठेवून साजरी करण्यात आली. याप्रसंगी संजीवनी उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक एन.के. चुटे, शिक्षक व्ही.ए. ठाकरे, पी.एस. एडलावार, आर.डी. यामावार, व्ही.एन. दडमल, टी. डी.मेश्राम उपस्थित होते. सर्वप्रथम शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी.एस. एडलावार तर आभार व्ही.एन. दडमल यांनी मानले.
शिवचरित्राच्या प्रेरणेतून धाडसी व समाजशील विद्यार्थी घडावा- डाॅ. सुरेश लडके
गडचिरोली : शिवचरित्राच्या प्रेरणेतून धाडसी व समाजशील विद्यार्थी घडावा, असे प्रतिपादन प्रज्ञा संस्कार स्कूलचे समन्वयक डाॅ. सुरेश लडके यांनी केले. प्रज्ञा संस्कार काॅन्व्हेंटच्या प्रांगणात शिवजयंतीनिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला स्मिता लडके, मुख्याध्यापिका सविता गोविंदवार, चेतन गोरे, रिझवाना पठाण, जयश्री मुळे उपस्थित होते. याप्रसंगी जागृती मेश्राम व ॠतुजा मांडवकर आदी विद्यार्थिनींनी शिवाजी महाराजांचे कर्तृत्व आपल्या दमदार सादरीकरणातून मांडत श्रोत्यांची मने जिंकली. तसेच शिवाजी महाराजांचा पाळणा व विजयगाथा नृत्य सादर केले. दीपाली बोरकुटे या शिक्षिकेने गीतगायन केले. सूत्रसंचालन आस्था कोलते व भाग्यलक्ष्मी कोल्हे यांनी केले. यशस्वितेसाठी मंगला गावंडे, राहुल मडावी, कार्तिक भोयर, अवंती धंदरे, पुष्पा गुज्जनवार, दीपाली बोरकुटे, प्रणाली मेश्राम व शिक्षकांनी सहकार्य केले.
शिवाजी महाराजांची कल्याणकारी व्यवस्था काळाची गरज - सूरज कोडापे
भारतीय राज्यघटनेतील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे ही इतरत्र कुठूनही न घेता शिवाजी महाराजांच्या कल्याणकारी राज्याच्या विचाराने प्रभावित होऊन घटनेत समाविष्ट केली गेली. या तत्त्वांची अंमलबजावणी देशाच्या सर्वसमावेशक विकासासाठी अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन शिवव्याख्याते सूरज कोडापे यांनी केले.
स्थानिक कात्रटवार कॉम्प्लेक्समध्ये टायगर ग्रुपच्या वतीने शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. शहरातील प्रमुख चौकात शिवाजी महाराजांचे ५० फुटी बॅनर झळकावून त्यांना ढोल-ताशांच्या गजरात अभिवादन करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून बंडू शनिवारे, संजय बारापात्रे, हेमंत जंबेवार, अंकुश कुडावले, दीपक भारसागडे, स्वप्नील घोसे उपस्थित होते. प्रास्ताविक टायगर ग्रुपचे जिल्हा प्रमुख दीपक भारसागडे तर आभार अरबाज शेख यांनी मानले. यशस्वितेसाठी इम्रान खान, विशाल हरडे, ऋषिकेश बारापात्रे, नावेद पठाण, सार्थक खांडरे, पुरब शील, कल्पक मुपिडवार, नीलू भारसागडे, अभिषेक गंडाटे, खुशबू चिताडे यांनी सहकार्य केले.
गोंडवाना सैनिकी विद्यालय गडचिरोली : येथे शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी उपमुख्याध्यापक ओमप्रकाश संग्राम होते. प्रमुख पाहुणे म्हणून गजानन अनमुलवार, संतोष बाेबाटे, आनंद चौधरी, प्रशांत मशाखेत्री उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांनी, शिवाजी महाराजांच्या जीवनावर विचार व्यक्त केले तर ओमप्रकाश संग्रामे यांनी यांनी महाराजांच्या कार्याची वेगवेगळी उदाहरणे देऊन विद्यार्थांना मार्गदर्शन केले.