शारदा, दुर्गा विसर्जनास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 06:00 IST2019-10-10T06:00:00+5:302019-10-10T06:00:25+5:30

आरमोरीचा दुर्गा उत्सव विदर्भात प्रसिध्द आहे. आरमोरी शहरातील पाच ते सहा सार्वजनिक मंडळाने यंदा विविध प्रकारचे नाविन्यपूर्ण व आकर्षक देखावे सादर करून भाविकांची गर्दी खेचून घेतली. सायंकाळी ५ वाजतानंतर आरमोरी शहरातील दुर्गा उत्सव पाहण्यासाठी परिसरासह जिल्हाभरातील भाविक व नागरिकांची गर्दी होत होती.

Sharda, Durga Dissolution Begin | शारदा, दुर्गा विसर्जनास प्रारंभ

शारदा, दुर्गा विसर्जनास प्रारंभ

ठळक मुद्देभाविकांची गर्दी : ढोलताशाच्या गजरात निरोप

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागात गेल्या १० दिवसांपासून सुरू असेलल्या दुर्गोत्सवाची सांगता झाली. बुधवारी सकाळपासून अनेक ठिकाणी दुर्गा विसर्जन मिरवणुका निघाल्या. विजयादशमीच्या दुसऱ्या दिवशीपासून म्हणजे, बुधवारपासून शारदा, दुर्गा विसर्जनास प्रारंभ झाला आहे. विसर्जनाच्या पहिल्या दिवशी गडचिरोली, आरमोरी शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात बँड, संदल व ढोलताशाच्या गजरात माताजीला निरोप देण्यात आला.
आरमोरीचा दुर्गा उत्सव विदर्भात प्रसिध्द आहे. आरमोरी शहरातील पाच ते सहा सार्वजनिक मंडळाने यंदा विविध प्रकारचे नाविन्यपूर्ण व आकर्षक देखावे सादर करून भाविकांची गर्दी खेचून घेतली. सायंकाळी ५ वाजतानंतर आरमोरी शहरातील दुर्गा उत्सव पाहण्यासाठी परिसरासह जिल्हाभरातील भाविक व नागरिकांची गर्दी होत होती. गडचिरोली शहरातही रात्री १०.३० वाजेपर्यंत गरबा, दांडियाची रेलचेल राहत होती. गडचिरोली शहरात दोन दिवस दांडिया, गरबा स्पर्धा आयोजित करण्यात आले. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नवरात्र उत्सवादरम्यान जिल्हाभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. ग्रामीण भागातील काही मंडळांनी महिला व विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा घेतल्या.
काही सार्वजनिक शारदा व दुर्गा उत्सव मंडळांनी रक्तदान शिबिर आयोजित करून सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला. काही ठिकाणी निवडणुकीसाठी मतदार जागृतीही झाली. नवरात्र उत्सव व विसर्जनादरम्यान पोलीस विभागाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गुरूवारी आणि शुक्रवारी गडचिरोलीसह अनेक ठिकाणी विसर्जन करण्यात येणार आहे.

Web Title: Sharda, Durga Dissolution Begin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.