शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

धर्मरावबाबांच्या बालेकिल्ल्यात शरद पवार गट ठोकणार शड्डू

By संजय तिपाले | Updated: July 10, 2023 14:06 IST

गडचिरोलीत बुधवारी बैठक : माजी मंत्री अनिल देशमुख साधणार समर्थकांशी संवाद

गडचिरोली : राज्यात घडलेल्या सत्तानाट्यात अजित पवार यांची साथ देणारे नेते शरद पवार गटाच्या टार्गेटवर आहेत. दोन दिवसांपूर्वी खुद्द शरद पवार यांनी नाशिकच्या येवला येथे मंत्री छगन भुजबळांच्या होमपिचमध्ये जाऊन जोरदार टोलेबाजी केली होती. आता मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या बालेकिल्ल्यात माजी मंत्री अनिल देशमुख हे शड्डू ठोकणार आहेत. १२ जुलैला ते समर्थकांशी संवाद साधणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील ४० आमदारांसह अजित पवार यांनी भाजप व शिवसेना (शिंदे गट) सरकारला पाठिंबा दिला. याची बक्षिसी म्हणून अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद तर प्रमुख आठ नेत्यांना मंत्रिपद मिळाले. अहेरी मतदारसंघातून विधानसभेत गेलेले जिल्ह्यातील मातब्बर नेते धर्मरावबाबा आत्राम यांच्याही गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली. दरम्यान, अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवार यांच्या गटाने पुनर्बांधणीसाठी दौरे सुरु केले आहेत. याची सुरुवात नाशिकमधून करण्यात आली.आता धर्मरावबाबांच्या होमपिचवर माजी मंत्री अनिल देशमुख यांची तोफ धडाडणार आहे.

१२ जुलै रोजी ते शरद पवार यांना मानणाऱ्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. वर्धा येथील बैठक आटोपून ते दुपारी तीन वाजता गडचिरोलीत पोहोचतील. शहरातील एका मंगल कार्यालयात ही बैठक पार पडत आहे. या बैठकीत ते समर्थकांना काय संदेश देतात व धर्मरावबाबा आत्राम यांच्या बंडावर काय भाष्य करतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस श्याम धाईत, शहराध्यक्ष व माजी न.प.सभापती विजय गोरडवार आदी पदाधिकाऱ्यांनी या बैठकीची जय्यत तयारी सुरु केली असून शरद पवार यांच्या समर्थनार्थ हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्हाध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात

धर्मरावबाबा आत्राम यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकरांसह सर्व तालुकाप्रमुख तसेच रायुकॉ जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर हे अजित पवार गटात गेले आहेत. त्यामुळे शरद पवार गटासमोर संघटन बांधणीचे आव्हान आहे. गडचिरोली जिल्हा निरीक्षकपदी चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांची प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निवड केली. आता गडचिरोलीच्या जिल्हाध्यक्षपदाची  माळ कोणाच्या गळ्यात पडते, याची उत्सुकता आहे. तूर्त चामोर्शी बाजार समिती सभापती अतुल गण्यारपवार यांचे नाव यासाठी अग्रक्रमावर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :PoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसAnil Deshmukhअनिल देशमुखSharad Pawarशरद पवारGadchiroliगडचिरोली