लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील शेतकºयांच्या समस्या जाणून घेण्यासाठी राष्टÑवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार १५ नोव्हेंबर रोजी गडचिरोली जिल्हा दौºयावर येणार आहेत.शरद पवार यांच्या दौºयाच्या पार्श्वभूमीवर राकाँचे निरिक्षक राजेंद्र वैद्य यांनी ५ नोव्हेंबर रोजी राष्टÑवादी काँग्रेसच्या पदाधिकाºयांची जिल्हास्तरीय आढावा बैठक घेतली. पवार यांची गडचिरोली येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेला जास्तीत जास्त नागरिक उपस्थित राहतील, यासाठी प्रयत्न करावे. राज्यात राष्टÑवादी काँग्रेसची एकहाती सत्ता प्राप्त करण्यासाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. पवार यांचा दौरा यशस्वी करण्यासाठी राष्टÑवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते व पदाधिकाºयांनी नियोजन करावे, असे निर्देश वैद्य यांनी दिले. या बैठकीला पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, जिल्हा परिषद सदस्य जगन्नाथ बोरकुटे, सोनाली पुण्यपवार, प्रभाकर गडपायले, जगन जांभूळकर, फहीम काझी, विवेक बाबणवाडे, मुस्ताक शेख, राजू डांगेवार, डॉ.देविदास मडावी, सुलोचना मडावी, तुकाराम पुरणवार, एम. ए. येकालवार उपस्थित होते.
शरद पवार १५ ला गडचिरोली दौºयावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 22:53 IST