शांतिलाल मुथ्था यांचे गडचिरोलीत आज आगमन

By Admin | Updated: December 22, 2016 02:15 IST2016-12-22T02:15:34+5:302016-12-22T02:15:34+5:30

भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शांतिलाल मुथ्था यांचे गडचिरोली येथे गुरूवारी सकाळी ८.३० वाजता आगमन होत आहे.

Shantilal Muththa's arrival in Gadchiroli today | शांतिलाल मुथ्था यांचे गडचिरोलीत आज आगमन

शांतिलाल मुथ्था यांचे गडचिरोलीत आज आगमन

गडचिरोली : भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शांतिलाल मुथ्था यांचे गडचिरोली येथे गुरूवारी सकाळी ८.३० वाजता आगमन होत आहे. भारतीय जैन संघटना गडचिरोली व चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांचे आरमोरी मार्गावरील वन विभागाच्या नाक्याजवळ स्वागत केले जाणार आहे.
शांतिलाल मुथ्था फाऊंडेशन यांच्या वतीने ‘मूल्यवर्धन’ हा उपक्रम जि. प. शाळांमध्ये राबविला जात आहे. हा उपक्रम राज्यातील ३४ जिल्ह्यांसह गडचिरोली जिल्ह्यातील तळोधी केंद्रात राबविला जात आहे. या उपक्रमाचा आढावा घेण्यासाठी शांतिलाल मुथ्था तळोधी येथे येत आहेत. मुथ्था यांचे भारतीय जैन संघटना शाखा गडचिरोली व चंद्रपूरच्या वतीने स्वागत केले जाणार आहे. यावेळी भारतीय जैन संघटना शाखा चंद्रपूरचे अमर गांधी, दीपक पारख, महेंद्र मंडलेचा, प्रशांत बैद, नीरज खजांची, जितेंद्र जोगड, गौरव कोचर, दिलीप भंडारी, पदम लोढा, रोहित पुगलिया उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. गणेश जैन, शैलेश महाजन, प्रकाशभाई कामदार तथा भारतीय संघटना गडचिरोली शाखेच्या वतीने करण्यात आले आहे. मुथ्था हे तळोधीवरून दुपारी १२.३० वाजता गडचिरोली येथे परत येणार आहेत. धानोरा मार्गावरील हॉटेल रामायण येथे मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Shantilal Muththa's arrival in Gadchiroli today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.