बिरसा मुंडा बाॅलिबाल स्पर्धेत शंकरनगर अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:26 IST2021-02-22T04:26:03+5:302021-02-22T04:26:03+5:30
गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने आरमोरी पोलीस स्टेशनतर्फे बिरसा मुंडा व्हाॅलिबाॅल स्पर्धा तीनही वर्षी घेण्यात आली. या वर्षीच्या एक दिवसीय ...

बिरसा मुंडा बाॅलिबाल स्पर्धेत शंकरनगर अव्वल
गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने आरमोरी पोलीस स्टेशनतर्फे बिरसा मुंडा व्हाॅलिबाॅल स्पर्धा तीनही वर्षी घेण्यात आली. या वर्षीच्या एक दिवसीय व्हाॅलिबाॅल स्पर्धेत बारा संघाने सहभाग घेतला होता. इतर संघांना मागे टाकण्याची परंपरा कायम ठेवत सलग तिसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक पटकाविला. तीन हजार रुपयाचे प्रथम बक्षीस व ट्रॉफी प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. स्पर्धेचे उद्घाटन आरमोरीचे तहसीलदार कल्याणकुमार दहाट व आरमोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिगंबर सूर्यवंशी यांच्या हस्ते झाले.
यावेळी प्रमुख म्हणून एपीआय भाऊसाहेब बोरसे, दादाजी चव्हाण उपस्थित होते. प्रथम क्रमांक शंकरनगर, द्वितीय मोझरी तर तृतीय क्रमांक आरमोरीच्या संघाने पटकावला. विजेत्या शंकरनगरच्या संघाला विभाग स्तरावर आणि जिल्हा स्तरावर खेळण्यासाठी संधी उपलब्ध झालेली आहे. संघाचे संघनायक अलोक राय, मिथुन मंडल, लोकेश शहा, विप्रो शहा, मुकेश सरकार, राजेंद्र सरकार, संदीप मिस्त्री, सौरभ मलिक, सुमित मंडल, बादल मंडल या खेळाडूंचे शंकरनगर गावात व तालुक्यात कौतुक केले जात आहे.