शिक्षण आयुक्तांनी फोकुर्डीत केले श्रमदान
By Admin | Updated: January 21, 2016 00:19 IST2016-01-21T00:19:24+5:302016-01-21T00:19:24+5:30
स्थानिक कर्मवीर दादासाहेब देवतळे महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबिर तालुक्यातील फोकुर्डी येथे सुरू आहे.

शिक्षण आयुक्तांनी फोकुर्डीत केले श्रमदान
चामोर्शी : स्थानिक कर्मवीर दादासाहेब देवतळे महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबिर तालुक्यातील फोकुर्डी येथे सुरू आहे. दरम्यान रासेयो स्वयंसेवकांकडून श्रमदान सुरू असताना राज्याचे शिक्षण आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर बुधवारी सकाळी १० वाजता येथे पोहोचले व त्यांनी हाती झाडू घेऊन रासेयो स्वयंसेवकासमावेत श्रमदान केले. तसेच शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाची माहिती विद्यार्थ्यांना दिली व विद्यार्थ्यांकडूनही त्यांनी विविध प्रकारची माहिती घेतली.
यावेळी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) माणिक साखरे, प्रा. संजय म्हस्के, प्रा. दीपक ब्राह्मणवाडे, प्रा. म्हस्के, प्रा. गाजर्लावार व रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. भूपेश चिकटे आदी उपस्थित होते. फोकुर्डी गावात शिक्षण आयुक्त स्वच्छता कार्यक्रमात श्रमदान करीत असल्याने रासेयो स्वयंसेवकांचा उत्साहही प्रचंड दुणावला. मंगळवारपासून शिक्षण आयुक्त गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी कुरखेडा, देसाईगंज तालुक्यातील शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. (तालुका प्रतिनिधी)